Cotton Farming : यंदा नैऋत्य मानसूनवर एल निनोचे सावट आहे. यामुळे मान्सून काळात कसं पर्जन्यमान राहणार? दुष्काळ पडणार का? खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळणार का? यांसारखे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व शेतीची सर्व कामे जवळपास पूर्ण करून घेतली आहेत. मशागतीची कामे पूर्ण झाली असून आता शेतकरी बांधव पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. समाधानकारक आणि पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर आता कापसाच्या पेरणीला देखील सुरुवात होणार आहे.
यंदा मात्र शेतकऱ्यांना कापसाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची पेरणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आज आपण कापसाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या आणि महाराष्ट्रासाठी शिफारशीत करण्यात आलेल्या कापूस वाणाची माहिती जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! पीएम किसान योजनेबाबत शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, योजनेच्या अंमलबजावणीत येणार पारदर्शकता, वाचा….
कापसाचे सुधारित वाण
बायोसीड GHH 029 :- कापसाचे हे एक सुधारित वाण आहे. बायोसीड कंपनीचे हे वाण महाराष्ट्रातील हवामानासाठी अनुकूल आहे. कापसाची ही जात अधिक उत्पादनासाठी ओळखली जाते. तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, कापसाचे हे वाण बागायती आणि कोरडवाहू अशा दोन्ही सिंचन परिस्थितीमध्ये अनुकूल आहे. कापसाची ही जात लागवड केल्यानंतर साधारणता 155 ते 160 दिवसात काढण्यासाठी तयार होते. असं सांगितलं जात की, या जातीपासून 9 ते 15 क्विंटल प्रति एकर पर्यंतचे उत्पादन मिळू शकते.
हे पण वाचा :- नमो शेतकरी योजना : पंतप्रधान मोदींमुळे योजनेचा पहिला हफ्ता लांबला; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण?
युएस ऍग्रीसीडचे US 7067 :- युएस ॲग्रीसीडचे युएस 7067 हे एक लोकप्रिय वाण आहे. या जातीची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या जातीची लागवड केल्यानंतर साधारणता 155 ते 160 दिवसात पिक परिपक्व बनते. या जातीची लागवड बागायती आणि कोरडवाहू अशा दोन्ही सिंचन परिस्थितीमध्ये केली जाऊ शकते. या जातीची दाट लागवड केली जाऊ शकते. या जातीपासूनही शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, यंदाच्या खरीप हंगामात ‘या’ पिकांची लागवड करू नका ! कृषी विभागाचा महत्वाचा सल्ला