Cotton Farming : कपाशी पीक उत्पादित करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. जर तुमचाही यंदाच्या खरीप हंगामात कपाशी पीक लागवड करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरंतर यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने नुकताच जाहीर केला आहे. यामुळे यावर्षी साहजिकच कपाशी लागवडीखालील क्षेत्र वाढणार आहे. तथापि जर कपाशी पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर पिकाचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक असते.
कपाशी पिकातून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी कपाशीच्या योग्य जातींची लागवड करणे तसेच योग्य पद्धतीने तणनियंत्रण करणे देखील जरुरीचे असते. दरम्यान, आज आपण कपाशी मधील गवत 100% नायनाट करणाऱ्यां एक स्वस्त तणनाशकांची माहिती पाहणार आहोत.
कपाशी पिकात तणनाशकाची फवारणी कधी करावी?
कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे कपाशी पीक 25 ते 30 दिवसांचे झाल्यानंतर तणनाशकाची फवारणी केली पाहिजे. पिकात जेव्हा दोन ते चार पानी गवत असते तेव्हा तणनाशकांची फवारणी करावी.
कोणते तणनाशक फवारले पाहिजे?
तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, कपाशी पिकातील तणांचा समूळ नाश करण्यासाठी टाटा कंपनीचे टाटा केवट अल्ट्रा (Tata Kevat Ultra) या तणनाशकाची फवारणी करावी. हे तणनाशक खूपच स्वस्त आहे.
या तणनाशकाची 500 एमएलची बाटली ही 1650 रुपयांना मिळते. हे हर्बीसाईड 300 Ml प्रति एकर या प्रमाणात फवारावे असा सल्ला देण्यात आला आहे. म्हणजेच जवळपास 1650 मध्ये दोन एकर क्षेत्रावरील कपाशी पिकात फवारणी करता येणार आहे.
इतर तणनाशक मात्र यापेक्षा अधिक महाग आहेत. यामुळे स्वस्तात तणनियंत्रण मिळवायचे असेल तर हे हर्बीसाईड तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.