शेतकऱ्यांवर संकटाची मालिका ! कापूस पिकावर ‘या’ किटकाचा प्रादुर्भाव, कसं करणार नियंत्रण, वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. राज्यात अजून मान्सूनचा समाधानकारक पाऊस झालेला नाही यामुळे अजूनही राज्यातील बहुतांशी भागात खरीप हंगामातील पेरणी पूर्ण झालेली नाही.

परंतु काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व कपाशी लागवड केली आहे. ज्या भागात मान्सूनपूर्व कपाशी लागवड झाली आहे त्या ठिकाणी मात्र पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. सध्या मान्सूनपूर्व कपाशी लागवड केलेले शेतकरी बांधव कापसाची निंदणी आणि खुरपणी करत आहेत.

अशातच मान्सूनपूर्व कपाशी लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या पुढ्यात एक वेगळेच संकट उभ राहिल आहे. कापसाच्या पिकावर पैसा म्हणजे वाणी कीटकांचा प्रादुर्भाव झाला आहे. आधीच पाऊस येत नसल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत यामुळे आणखीनच भर पडली आहे.

या किडीला असंख्य पाय असतात यामुळे मिलीपेड या नावाने ही कीड ओळखले जाते. ही कीड हाताचा स्पर्श झाला की गोलाकार अंकुचन पावते. 

हे पण वाचा :- पीएम किसान योजनेचे नवीन एप्लीकेशन लॉन्च ! शेतकऱ्यांचा असा होणार फायदा

गोलाकार अंकुचन पावल्यानंतर ही कीड अगदी पैशाप्रमाणेच दिसते. यामुळे या किडीला पैसा असं नाव पडलं आहे. या कीटकाच्या अनेक प्रजाती असून काळ्या आणि तपकिरी रंगाच्या प्रजाती आपल्याकडे सर्वाधिक आढळतात.

या किडीच्या वाढीसाठी जास्त प्रमाणात आद्रता, उष्ण व दमट हवामान पोषक असते. सध्या असंच हवामान महाराष्ट्रात आहे. यामुळे प्रमुख कापूस उत्पादक भागामध्ये या किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ही कीड रोपावस्थेत असलेल्या पिकावर हल्ला चढवते आणि यामुळे पिकाचे मोठे नुकसान होते.

अगदी प्रारंभिक टप्प्यावरच या कीटकामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याने या कीटकावर नियंत्रण मिळवणे जरुरीचे आहे. दरम्यान आज आपण या कीटकावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा :- राज्यात उद्यापासून पावसाला सुरुवात होणार! कोणत्या भागात पडणार पाऊस? भारतीय हवामान विभागाने स्पष्टच सांगितले

पैसा कीटकावर या पद्धतीने मिळवा नियंत्रण 

किड संपूर्ण शेतात पसरलेली असल्यास या कीटकावर रासायनिक पद्धतीने नियंत्रण मिळवावे लागणार आहे. यासाठी क्लोरपायरीफॉस (२० ईसी) ३ मिली किंवा क्लोरपायरीफॉस ५० टक्के + सायपरमेथ्रीन (५ टक्के एसपी) १.५ मिली प्रति लीटर या प्रमाणे फवारणी करण्याचा सल्ला जाणकार लोकांनी दिला आहे.

सद‍र कीडनाशकाची शिफारस मिलीपेड म्हणजे पैसा कीटकासाठी नाही, मात्र कापूस पिकामध्ये ही फवारणी प्रभावी ठरत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

तसेच कार्बोसल्फान (६ टक्के दानेदार) किंवा क्लोरपायरीफॉस (१० टक्के दानेदार) किंवा फिप्रोनिल (०.३ टक्के) ५ किलो प्रति १०० किलो शेणखतात मिसळून ओळीने शेतातील रोपा जवळ वापरल्यास या कीटकावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.

ही सदरील कीटकनाशके परिणामकारक असल्याचा दावा करण्यात आला असला तरी देखील ही सर्व कीटकनाशक लेबल क्लेम नाहीत. यामुळे पिकावर फवारणी करण्यापूर्वी तज्ञ लोकांचा सल्ला घेणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे.

हे पण वाचा :- अहमदनगरच्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या सुधारित वाणाचे कांदा बियाणे आता ‘या’ ठिकाणी उपलब्ध होणार ! 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा