कापसाचे एकरी 20 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवायचे ना ! मग ‘या’ वाणाची लागवड कराच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Farming : जर तुम्हीही शेतकरी असाल आणि यंदा खरीप हंगामात कापूस लागवड करण्याचा विचार असेल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी. वास्तविक, कापसाला आपण पांढर सोन म्हणतो. आपल्या राज्यात कापूस लागवडीखालील क्षेत्र देशात सर्वाधिक आहे. मात्र असे असतानाही कापूस उत्पादनाचा विचार केला तर गुजरात राज्याचा प्रथम क्रमांक येतो.

अर्थातच आपल्याकडे अधिक क्षेत्रावर कापूस लागवड होत असली तरी देखील गुजरात राज्याच्या तुलनेने उत्पादन कमी आहे. आधी आपल्या राज्यातही कापसाची उत्पादकता खूपच चांगली होती. मात्र आता आपल्या राज्याची कापूस उत्पादकता कमी झाली आहे. कापूस उत्पादकता कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत.

यामध्ये एकाच जमिनीवर वारंवार कापसाचे पीक घेणे हे एक प्रमुख कारण आहे. याव्यतिरिक्त, पीक व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांकडून काही चुका होतात यामुळे देखील कापसाची उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच दर दोन वर्षानंतर ज्या जमिनीत कापसाची लागवड करायची आहे त्या जमिनीची खोल नांगरणी करणे आवश्यक असते.

मात्र अनेक शेतकरी खोल नांगरणी करत नाहीत यामुळे गुलाबी बोंड अळीसारख्या घातक कीटकांचा प्रादुर्भाव कापूस पिकावर होतो आणि यामुळे साहजिकच उत्पादनात घट होत आहे. याव्यतिरिक्त अनेक शेतकरी बांधव सातत्याने फरदड ऊत्पादन घेतात. फरदड उत्पादनामुळे साहजिकच तात्पुरता उत्पन्न मिळतं मात्र यामुळे लॉन्ग टर्म मध्ये मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.

तसेच अनेक शेतकरी बांधव कापसाच्या चांगल्या सुधारित वाणांची पेरणी करत नाहीत. त्यामुळे देखील कापूस उत्पादकता ढासाळत चालली आहे. अशा परिस्थितीत, आज आपण कापसाच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. आज आपण कापसाच्या एकरी 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन देण्यास सक्षम असलेल्या जातींची माहिती जाणून घेऊया.

कापसाच्या प्रगत जाती खालीलप्रमाणे

कबड्डी :- महाराष्ट्रात कापसाचे हे वाण विशेष लोकप्रिय बनले आहे. खरंतर गेली तीन वर्ष महाराष्ट्रात पावसाळी काळात अतिवृष्टी झाली. पण या अतिवृष्टीच्या काळात देखील या वाणातून चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे. त्यामुळे कापसाचे हे वाण शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय बनले आहे.

याची लोकप्रियता एवढी आहे की सध्या हे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाहीये. याचा फायदा मात्र विक्रेते घेत आहेत. अनेक दुकानदार या वाणाच्या बियाण्याचे पॉकेट महागड्यात दरात विक्री करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कापसाचे हे वाण एकरी 8 ते 12 क्विंटल पर्यंतचे उत्पादन देण्यास सक्षम आहे.

परंतु काही शेतकऱ्यांनी कापसाच्या या जातीपासून एकरी 20 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवले असल्याचा दावा करण्यात आला आहे. साहजिकच सर्वच जमिनीत आणि सर्वच शेतकऱ्यांना एकरी एवढं उत्पादन मिळणार नाही. मात्र तरीही ऍव्हरेज 8-10 क्विंटल पर्यंतचे उत्पादन तरी यातून मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा आहे. कापसाचे हे वाण मध्यम ते भारी जमिनीत लावले जाऊ शकते.

विशेष म्हणजे कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही सिंचन परिस्थितीमध्ये या जातीच्या कापसाची लागवड शक्य आहे. साधारणता 160 ते 180 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनत असल्याची माहिती कृषी तज्ञांच्या माध्यमातून समोर आली आहे. या जातीच्या कापसाचे बोंड हे मोठे आणि वजनदार असते. कापसाच्या बोंडाचे वजन साधारणतः पाच ते सहा ग्रॅम भरते. या जातीच्या कापसाची लागवड मे ते जून पर्यंत केली जाऊ शकते.

सुपरकॉट :– कापसाचे हे देखील वाण शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय बनले आहे. या जातीची लागवड देखील मध्यम ते भारी जमिनीत शक्य आहे तसेच कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही सिंचन परिस्थितीमध्ये या जातीच्या कापसाची लागवड केली जाऊ शकते अशी माहिती देण्यात आली आहे. या जातीच्या कापसाचे पीक साधारणता 160 ते 170 दिवसात परिपक्व होते. या जातीपासून एकरी आठ ते दहा क्विंटल पर्यंतचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

राशीं 659 :- जर तुमच्याकडे काळी कसदार जमीन असेल म्हणजेच भारी जमीन असेल तर तुम्ही या वाणाची निवड करू शकता. हे वाण केवळ भारी जमिनीत चांगले उत्पादन देते हलक्या जमिनीत या जातीपासून चांगले उत्पादन मिळणार नाही. यामुळे हलकी जमीन असेल तर या वाणाची लागवड करू नका.

वास्तविक कापसाची लागवड ही मध्यम ते भारी जमिनीतच केली जाते मात्र अलीकडे असे काही वाण उपलब्ध झालेत जी हलक्या जमिनीत देखील चांगले उत्पादन देतात. दरम्यान, या राशी 659 या कापसाच्या वाणाबाबत बोलायचं झालं तर हा वाण भारी जमिनीसाठी शिफारशीत करण्यात आला आहे. या जातीचे कापूस पीक 145 ते 160 दिवसात काढणीसाठी तयार होते. बोन्डाचा आकार मोठा असतो वजन चार ते पाच ग्रॅम भरते. हा कापसाचा वाण वेचणीस सोपा असून एकरी उत्पादन आठ ते बारा क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा