Cotton Farming : कापूस पीक लागवडीनंतर 25 दिवसांनी ‘हे’ काम करा, एकरी 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळणार, वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Farming : सध्या राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. त्यामुळे वातावरणात गारवा तयार झाला आहे. सर्वत्र अल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. यामुळे सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. गडकिल्ल्यांवर आणि हिल स्टेशनवर पर्यटकांची गर्दी ओसांडली आहे.

शेत शिवारात देखील शेतकऱ्यांची धावपळ पाहायाला मिळत आहे. पेरणीसाठी तसेच पेरणीनंतरच्या कामांसाठी शेतशिवारात शेतकरी बांधव आपल्या मजुरांसमवेत तसेच परिवारासमवेत राबत आहेत. पावसाच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यातील बहुतांशी भागात कापूस पीक लागवड झाली आहे. काही भागात कापूस लागवड करून जवळपास 20 ते 30 दिवसांचा कालावधी देखील उलटला आहे. कोरडवाहू भागात मात्र सध्या कापूस लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

दरम्यान आज आपण कापूस पीक लागवड केल्यानंतर 25 दिवसांनी कोणत्या औषधाची फवारणी केली पाहिजे याबाबत जाणून घेणार आहोत. कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कापूस पीक लागवड केल्यानंतर साधारणतः 25 दिवसांनी या पिकासाठी पहिली फवारणी घेतली पाहिजे.

या कालावधीत पहिली फवारणी घेतल्यास कापसाचे पीक जोमदार वाढते, पांढरी मुळीची वाढ चांगली होते, पिकाला चांगले पोषक घटक पोहोचतात आणि यामुळे उत्पादनात वाढ होते. खरंतर अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून कापूस पिकासाठी पहिली फवारणी कोणती घेतली पाहिजे याबाबत विचारणा केली जात होती. यामुळे आज आपण या लेखातून या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कापूस पिकासाठी पहिली फवारणी कोणती?

कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कापूस पीक लागवड करून 25 दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर पिकासाठी पहिली फवारणी घ्यायची आहे. खरंतर पीक लागवड केल्यानंतर सुरुवातीचे 20 ते 25 दिवस पिकासाठी अतिशय महत्त्वाचे असतात.

कारण की, या कालावधीमध्ये मावा आणि तुडतुडे या कीटकांचा प्रादुर्भाव पिकावर पाहायला मिळतो. यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात या कीटकांवर नियंत्रण मिळवणे आवश्यक ठरते. यासोबतच या कालावधीमध्ये पांढरी मुळीच्या वाढीसाठी देखील पोषक घटक पिकाला देणे आवश्यक राहते.

यामुळे एक्सट्रा (Extra) 5 gm किंवा विक्टर (Victor) 10ml + ह्यूमिक ऍसिड 30-40 gm + 19-19-19 विद्राव्य खत 50 gm हे औषध या प्रमाणात घेऊन पहिली फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की हे प्रमाण 15 लिटर पंपासाठी देण्यात आले आहे. यामुळे तुम्ही तुमच्या क्षेत्रानुसार फवारणीचे नियोजन करायचे आहे.