नादखुळा ! राज्यातील शेतकऱ्याने मात्र 35 गुंठ्यात मिळवले 20 क्विंटल कापूस उत्पादन, कस केल नियोजन ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची संपूर्ण राज्यभर शेती केली जाते. यंदा मात्र कमी पावसामुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होणार असा अंदाज आहे. दरम्यान या विपरीत परिस्थितीमध्येही पुण्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने कापसाच्या पिकातून चांगले विक्रमी उत्पादन मिळवून दाखवले आहे.

खरंतर राज्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात अपेक्षित असा पाऊस बरसला नसल्याने कापसाची एकरी उत्पादकता कमी होणार असे बोलले जात आहे. पण, जर योग्य नियोजन केल तर अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील कापसाच्या पिकातून चांगले उत्पादन मिळवता येऊ शकते.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या मांडवगण फराटा येथील शेतकरी शहाजी शामराव फराटे यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. शहाजी यांनी आपल्या 35 गुंठ्यात कापसाची लागवड केली.

यंदा महाराष्ट्रात कमी पावसामुळे कापूस उत्पादन कमी झाले आहे तर दुसरीकडे शहाजी बाप्पू यांनी योग्य नियोजनाच्या जोरावर एक एकर पेक्षा कमी क्षेत्रातून वीस क्विंटल एवढे दर्जेदार उत्पादन मिळवले आहे.

विशेष बाब म्हणजे शहाजी यांनी यंदा पहिल्यांदाच कापसाची लागवड केली आहे. दरम्यान पहिल्याच पिकातून त्यांना विक्रमी उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे शहाजी यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

शहाजी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जुलै महिन्यात महिको धनदेव या जातीच्या कापसाची लागवड केली. चांगल्या उत्पादनासाठी त्यांनी शेतात दोन ट्रेलर शेणखत टाकले. कापूस लागवड करण्यापूर्वी त्यांनी योग्य मशागत केली.

प्रथम ट्रॅक्टरच्या साहाय्याने चार फुटांचा पट्टा तयार केला. दोन फूट अंतरावर ३५ गुंठ्यात बियांण्याचे टोपण केले. मग पिकाची थोडी वाढ झाली अन दोन खुरपणी केल्यानंतर खते व औषधांचा डोस देण्यात आला.

१०-२६-२६ या मायक्रो न्यूटन खताचा गरजेनुसार वापर केला असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पिकासाठी गरजेनुसार वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी केली आहे. यामुळे त्यांना पाच महिन्यात चांगले उत्पादन मिळाले आहे.

पण सध्या बाजारात कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने त्यांनी कापसाची साठवण करून ठेवली आहे. आगामी काळात भाव वाढ होईल अशी आशा त्यांना आहे. दरम्यान त्यांनी कापसाच्या पिकात फ्लॉवरचे अंतर पीक घेतले होते. यातूनही त्यांना जवळपास 70 ते 80 हजाराचा नफा मिळाला आहे.

कापसाचे एका एकरात जास्तीत जास्त अठरा क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. मात्र शहाजी बापू यांनी मात्र 35 गुंठ्यात म्हणजेच एका एकर पेक्षा कमी जमिनीतून 20 क्विंटलचे दर्जेदार उत्पादन मिळवून दाखवले आहे. यामुळे सध्या शहाजी बापू यांची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा