शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! कापसाच्या ‘या’ वाणातून मिळतेयं 16 ते 18 क्विंटल उत्पादन, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Farming : महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ही बातमी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे. कारण की, परभणी येथील उपसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कापसाच्या तीन नवीन जाती विकसित केल्या आहेत. या

साठी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी तब्बल आठ वर्षे कठोर मेहनत घेतली आहेत. आठ वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या नांदेड कापूस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांना तीन नवीन जाती विकसित करण्यात यश आले आहे.

विशेष बाब म्हणजे नव्याने विकसित झालेल्या या तीन जाती कोरडवाहू भागासाठी शिफारशीत करण्यात आल्या आहेत. या जाती महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात लागवडीसाठी उपयुक्त ठरणार आहेत.

यामुळे कापसाच्या या नव्याने विकसित झालेल्या जातीं मराठवाडा, विदर्भ खानदेशसह गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील कापूस उत्पादकांसाठी फायदेशीर राहणार आहेत. सध्या स्थितीला कापसाचे हे वाण विक्रीसाठी उपलब्ध नाही.

हे नवीन वाण केंद्रीय वाण प्रसारण समितीने मध्य भारतात लागवडीसाठी शिफारशीत केले आहे. यामुळे आता लवकरच हे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

मराठवाडा विद्यापीठाने तयार केलेले हे बीटी वाण सरळ वाणाचा प्रकार असून या जातींपासून मिळणारी सरकी बियाण्यासाठी सुद्धा वापरता येणार आहेत.

यामुळे कापूस उत्पादकांना दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करण्याची गरज राहणार नाही असे सांगितले जात आहे. एन.एच.१९०१, एन. एच. १९०२ व एन. एच. १९०४ या तीन जाती मराठवाडा विद्यापीठाने विकसित केल्या आहेत.

हे मध्यम लांबी असलेले धाग्याचे कापूस वाण हेक्टरी 16 ते 18 क्विंटल पर्यंतचे उत्पादन देण्यास सक्षम आहे. हे नव्याने विकसित झालेले तिन्ही वाण रस शोषक किडींसाठी प्रतिकारक आहेत.

तसेच हा वाण हिरवी बोंडअळी व ठिपक्याची बोंडअळी या अळ्यांना प्रतिकारक राहणार असा दावा तज्ञांनी केला आहे. यामुळे या कापसाच्या नव्याने विकसित झालेल्या जातींपासून चांगले विक्रमी आणि दर्जेदार उत्पादन मिळेल असे सांगितले जात आहे.

खरंतर राज्यात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या या पिकावर अवलंबित्व आहे. अशा परिस्थितीत कापसाचे नव्याने तयार झालेले हे वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा