गुलाबी बोंड अळीपासून कापसाचे पीक वाचवण्यासाठी ‘हे’ एक काम करा ! हमखास फायदा मिळणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Crop Management : कापूस हे राज्यासह संपूर्ण भारतात कमी अधिक प्रमाणात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. देशातील कापूस लागवडीचा विचार केला असता महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकावर येते. मात्र उत्पादनात गुजरात राज्य आघाडीवर आहे. गुजरात मध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी क्षेत्रावर कापसाची शेती केली जाते.

पण तिथे कापसाची एकरी उत्पादकता अधिक आहे. यामुळे उत्पादनाच्या बाबतीत गुजरात हे राज्य पहिल्या क्रमांकावर येते. याचाच अर्थ आपल्याकडे कापसाची एकरी उत्पादकता खूपच कमी आहे. कापसाचे उत्पादन कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत.

यामध्ये पहिले आणि महत्त्वाचे कारण म्हणजे गुलाबी बोंड अळी. या कीटकांच्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.यंदा तर मान्सून काळात कमी पाऊस बरसला असल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन कमी राहणार आहे.

अशा परिस्थितीत कापसाच्या पिकातून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.

यामुळे आज आपण गुलाबी बोंड आळी पासून कापसाचे पीक कसे वाचवावे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शेतकऱ्यांनी शिफारशींनुसार योग्य वेळी पिकाची पेरणी करावी.

किडींचा प्रादुर्भाव व त्यांच्या नियंत्रणासाठी फेरोमोन ट्रॅप वेळेवर बसवले पाहिजेत.

कमी उंचीचे आणि कमी कालावधीत तयार होणाऱ्या वाणांना प्राधान्य दिले पाहिजे.

पीक ४५-६० दिवसांचे झाल्यावर नीम आधारित कीटकनाशकाची फवारणी करा.

जेव्हा पीक 60-120 दिवसांचे असेल तेव्हा सिंथेटिक पायरेथ्रॉइड्सची फवारणी करू नये, शिफारशीनुसार इतर कीटकनाशकांची फवारणी मात्र केली जाऊ शकते.

पीक पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी शेतात ठेवलेले पूर्वीचे कापसाचे अवशेष नष्ट करावेत किंवा कापसाच्या पऱ्हाट्या दूर सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवाव्यात किंवा जाळून टाकाव्यात. 

जिनिंग मिलमध्ये कापसाची जिनिंग करून उरलेला माल नष्ट करून कापसाच्या सरकीला झाकून ठेवावे, जेणेकरून त्यामध्ये असलेल्या प्युपापासून निर्माण होणारी कीटक पसरणार नाही.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा