काय सांगता ! कापूस पिकावर फवारणी न करता गुलाबी बोंड आळीपासून पीक वाचवता येणार ? कसं ते वाचाच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Crop Management : जर तुम्ही यंदा कापूस पिकाची लागवड केलेली असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. आज आपण कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पिकावरील गुलाबी बोंड आळी वर नियंत्रण कसे मिळवायचे याविषयी चर्चा करणार आहोत.

कपाशी हे महाराष्ट्रातीलं खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. गेल्या हंगामात कापसाला फारसा भाव मिळाला नाही. सुरुवातीच्या टप्प्यात मुहूर्ताच्या कापसाला जरूर चांगला भाव मिळाला होता मात्र नंतर भाव खूपच गडगडले होते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे यंदा कापूस लागवड घटणार असे चित्र तयार झाले होते. पण राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी यंदाही कापसाचा जुगार खेळला आहे. यावर्षी यंदा राज्यभर टप्प्याटप्प्याने कापसाची लागवड झाली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली असल्याने कापसाचे पीक संकटात आले आहे.

तसेच गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. यामुळे कपाशी पिकासाठी घातक ठरणाऱ्या गुलाबी बोंड आळीला पोषक परिस्थिती तयार झाली आहे. ज्या भागात कपाशीची वेळेवर लागवड करण्यात आली आहे अशा भागात सध्या पिकाला पाते, फुले व काही ठिकाणी बोंडे लागत आहेत.

अशातच मात्र ढगाळ हवामान तयार झाल्याने गुलाबी बोंड अळीचे पतंग कापूस पिकावर घोंगावत आहेत. यामुळे आगामी काळात पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होणार असा दावा केला जात आहे.

यामुळे या किडीचा प्रादुर्भाव जर थांबवायचा असेल तर आत्तापासूनच काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत. यामुळे आज आपण कुठलीही फवारणी न करता गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण कसे करायचे याविषयी जाणून घेणार आहोत.

फवारणी विना गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण

1)यासाठी पिकाचे सूक्ष्म निरीक्षण करा आणि गुलाबी बोंड अळी असलेल्या डोमकळ्या तोडून टाका. या तोडलेल्या डोमकळ्या लगेच नष्ट करा. या कळ्या शेतापासून दूर नष्ट करा.

2)तसेच या किडीच्या पतंग नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करा. एकरी पाच याप्रमाणे कामगंध सापळ्यांचा वापर तुम्ही करू शकता. पण जर पतंगांची संख्या खूपच अधिक असेल तर एकरी दहा कामगंध सापळे तुम्ही वापरू शकता.

3)याव्यतिरिक्त कपाशीचे पीक 60 दिवसांचे झाल्यानंतर कृषी विभागातून ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी कीटकाचे ट्रायको कार्ड आणून एकरी दोन ते तीन या प्रमाणात लावू शकता. ट्रायकोग्रामा बॅक्ट्री हे परोपजीवी कीटक असून गुलाबी बोंड अळी खाते. याचा कपाशी पिकावर कोणताच विपरीत परिणाम होत नाही उलट गुलाबी बोंड अळी फस्त होते. मात्र हे ट्रायको कार्ड लावले असल्यास दहा दिवस कोणत्याही रासायनिक औषधांची फवारणी करायची नाही.

4)याशिवाय तुम्ही पक्षी थांबे देखील बसवू शकता. हेक्टरी 25 पक्षी थांबे बसवल्यास या कीटकाच्या पतंगावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.