कंपोस्ट खत निर्मितीचा व्यवसाय शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ! चांगल्या क्वालिटीचे कंपोस्ट खत कसे तयार करणार ? वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Compost Khat Business Model : गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात पिक उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला जात आहे. सुरुवातीच्या टप्प्यात रासायनिक खतांच्या वापरामुळे निश्चितचं शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळवता येणे शक्य झाले.

मात्र, गेल्या काही वर्षांपासून सातत्याने रासायनिक खतांचा अंदाधुंद वापर होत असल्याने आता रासायनिक खतांचा पिक उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे.

रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली असून यामुळे आता कोणत्याही पिकातून अपेक्षित असे उत्पादन मिळतं नाहीये.

हेच कारण आहे की, आता कृषी तज्ञांच्या माध्यमातून रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे.

विशेष म्हणजे अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी आता सेंद्रिय शेतीला अधिक प्राधान्य दिले आहे. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे निश्चितच शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू लागले आहे.

सेंद्रिय खताचा वापर केल्याने जमिनीची सुपीकता देखील वाढू लागली आहे. हेच कारण आहे की आता सेंद्रिय खतांची मागणी बाजारात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

अशा परिस्थिती शेतकरी बांधव आता कंपोस्ट खताचा व्यवसाय सुरू करून शेतीसोबतच अतिरिक्त उत्पन्न कमवू शकणार आहेत.

Yanule आता आपण चांगल्या क्वालिटीचे कंपोस्ट खत कशा पद्धतीने तयार केले जाऊ शकते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कंपोस्ट खत तयार करण्यासाठी कशाचा वापर करणार

कंपोस्ट खत तयार करण्यासाठी बांधावरील गवत, पिकांमधील गवत, झाडांची पाने, पाला पाचोळा, पिकांचे अवशेष, खराब झालेले फळ पिके, भाजीपाल्याचा कचरा, गोमूत्र, शेणखत इत्यादी वस्तूंचा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. यांपासून तयार झालेले कंपोस्ट खाते हे चांगल्या क्वालिटीचे राहते.

कंपोस्ट खतात या गोष्टीचा वापर करू नका

जनावरांचे मांस, हाडे, मासे किंवा कोणत्याही प्रकारच्या जनावरांच्या अवशेषापासून कंपोस्ट खत तयार करू नये असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे. जनावरांची चरबी, खराब झालेले डेरी प्रॉडक्ट, खराब झालेले अन्नधान्य इत्यादी गोष्टींपासून कंपोस्ट खत तयार करणे टाळावे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा