Cidco Homes : अलीकडे मुंबई नवी मुंबई सारख्या महानगरांमध्ये घर घेणे म्हणजे दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे अशीच गत झाली आहे. कारण की या शहरांमध्ये जेवढ्या उंच इमारती आहेत तेवढ्याच घरांच्या किमती देखील नवीन उंचीवर पोहोचल्या आहे. यामुळे सर्वसामान्यांना घर घेणे परवडत नसल्याचे वास्तव आहे. जीवाचा आटापिटा करूनही येथे सर्वसामान्य नागरिकांना घर घेता येत नाही.
यावर उतारा म्हणून सिडको आणि म्हाडाच्या घरांकडे पाहिले जाते. ही घरे परवडणाऱ्या दरात सर्वसामान्यांना उपलब्ध होतात. म्हाडा आणि सिडकोच्या घरांमुळे आत्तापर्यंत हजारो नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
दरम्यान सिडकोच्या नवी मुंबई येथील तळोजा आणि द्रोणागिरी नोड येथे 3322 घरांच्या सोडती संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येत आहे. खरे तर सिडको ने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती.
याची अर्ज भरण्यासाठीची अंतिम मुदत ही गेल्या महिन्यात अर्थात 16 एप्रिलला संपली. तसेच याची सोडत नियोजित वेळापत्रकाप्रमाणे 19 एप्रिल ला काढली जाणार असे जाहीर झाले होते. मात्र लोकसभेच्या आचारसंहितेमुळे ही सोडत 19 एप्रिल ला निघू शकली नाही.
पण, 19 एप्रिल ला सोडत निघणार नाही यासंदर्भातील अधिकृत वृत्त सिडको ने जारी केले नाही. त्याचवेळी सिडकोने ही सोडत आठ मे ला निघेल असे सांगितले. याबाबतची माहिती सिडकोने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिली.
परंतु यामुळे अर्जदारांमध्ये संभ्रम अवस्था तयार झाली. याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ही जूनच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे. 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सिडको ने लॉटरी काढणे अपेक्षित होते.
दरम्यान आता सिडको ने 8 मे ही तारीख रद्द करून 7 जूनला सोडत काढली जाईल असे स्पष्ट केले आहे. म्हणजेच सिडकोच्या या 3322 घरांसाठी 7 जून 2024 ला संगणकीय सोडत निघणार आहे.
यामुळे अर्जदारांना निश्चितच आता दिलासा मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या सोडतीची वाट पाहिली जात होती ती सोडत आता येत्या एका महिन्यात काढली जाणार आहे.