Cheapest Home Loan : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. घरांच्या किमती वाढण्यामागे वेगवेगळे फॅक्टर कारणीभूत आहेत. पण यामुळे अलीकडे सर्वसामान्यांना स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
घरांच्या वाढत्या किमती पाहता आता सर्वसामान्य लोक गृह कर्जाचा पर्याय स्वीकारून घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करत आहे. जर तुम्हीही अशाच विचारात असाल आणि होम लोन घेऊ इच्छित असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे.
कारण की आज आपण देशातील अशा काही बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की आपल्या ग्राहकांना स्वस्त व्याज दरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत.
खरे तर अनेकांच्या माध्यमातून सर्वात कमी व्याजदरात गृह कर्ज कोणत्या बँका पुरवत आहेत याविषयी विचारणा केली जात होती.
हेच कारण आहे की आज आम्ही देशात सर्वात कमी व्याजदरात कोणत्या बँका गृह कर्ज देत आहेत याबाबतची माहिती हजर घेऊन जर झालो आहोत.
सर्वात कमी व्याजदरात गृह कर्ज देणाऱ्या बँका ?
पैसा बाजार डॉट कॉम या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सध्या स्थितीला बँक ऑफ इंडिया ही सर्वात कमी व्याजदरात ग्राहकांना गृह कर्ज देत आहे. ही बँक 8.30% ते 10.75% व्याजदरात गृह कर्ज पुरवत आहे.
यानंतर युनियन बँक ऑफ इंडियाचा नंबर लागतो. ही बँक आपल्या ग्राहकांना 8.35% ते 10.75 टक्के या व्याजदर गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेचा नंबर लागतो.
स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक आपल्या ग्राहकांना 8.40% ते 10.15 टक्के व्याजदरात आपल्या ग्राहकांना होम लोन पुरवत आहे. त्यानंतर बँक ऑफ बडोदाचा नंबर लागतो. बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना 8.40% पासून ते 10.65% व्याजदरात होम लोन ऑफर करत आहे.
यानंतर मग पंजाब नॅशनल बँकेचा नंबर लागतो. पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना 8.45% ते 10.25 टक्के व्याजदरात गृह कर्ज देते. यानंतर मग युको बँकेचा नंबर लागतो.
युको बँक आपल्या ग्राहकांना 8.45% ते 10.30% व्याज दरात होम लोन ऑफर करत आहे. त्यानंतर पंजाब अँड सिंध बँकेचा नंबर लागतो. ही बँक आपल्या ग्राहकांना 8.50% ते 10% व्याजदरात होम लोन पुरवत आहे.