Cheapest Home In India : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे घर खरेदीची अनेकांची इच्छा अजूनही अपूर्णच आहे. घरासाठी सर्वसामान्य लोक आपल्या आयुष्याची सर्व जमापुंजी खर्च करतात. मात्र अलीकडे घरांच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत की आता घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.
बिल्डिंग मटेरियलचे वाढलेले दर, इंधनाचे वाढलेले दर, वाढती महागाई, वाढती मजुरी या सर्व पार्श्वभूमीवर आता घर घेणे म्हणजेच दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे असे वाटू लागले आहे. यामुळे अनेकांच्या माध्यमातून भारतात सर्वात स्वस्त घर कोणत्या शहरात उपलब्ध होते असा सवाल विचारला जात होता.
अशा परिस्थितीत, आज आपण भारतातील कोणत्या 5 शहरात परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होतात याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
खरंतर अलीकडे आर्थिक राजधानी मुंबईपासून ते राष्ट्रीय राजधानी दिल्लीपर्यंत सर्वत्र घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. कोरोना काळानंतर घर खरेदीचा आलेख मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.
यामुळे घरांच्या किमती सातत्याने वाढतच आहेत. कोविड काळाच्या पूर्वी मुंबई आणि दिल्लीमध्ये असणाऱ्या घरांच्या किमती आणि आत्ताच्या घरांच्या किमती याची तुलना केली असता यामधील ही तफावत खूप मोठी आहे हे आपल्या लक्षात येते.
यामुळे आज आपण भारतातील अशा पाच शहरांबाबत जाणून घेणार आहोत ज्यात परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होत आहेत. अफॉर्डेबिलिटी इंडेक्सनुसार, गुजरात मधील अहमदाबाद शहरात 2023 मध्ये कीफायतशीर दरात घरे उपलब्ध झाली आहेत.
या शहराचा रेशो 21 एवढा होता. गेल्यावर्षी कोलकत्ता हे शहर किफायतशीर दरात घर उपलब्ध करून देण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले असून या शहराचा रेशो 24 एवढा नमूद करण्यात आला आहे.
या यादीत आपल्या महाराष्ट्रातील पुण्याचा तिसरा क्रमांक लागतो, गेल्यावर्षी पुण्यातही किफायतशीर दरात सर्वसामान्यांना घर उपलब्ध झाली आहेत. याशिवाय या यादीत चेन्नईचा चौथा क्रमांक लागतो.
बेंगलोर हे शहर या यादीत पाचव्या क्रमांकावर येते, या शहराचा रेशो 26 एवढा नमूद करण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबईचा विचार केला असता देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी मुंबईत गेल्या वर्षी सर्वात महाग घरे मिळाली आहेत.
मुंबईचा रेशो याबाबतीत 50 पेक्षा अधिक नमूद करण्यात आला आहे. 2023 मध्ये मुंबईनंतर हैदराबाद आणि दिल्ली या शहरात सर्वात महाग घरे विकली गेली आहेत.