अधिक उत्पादन देणाऱ्या हरभऱ्याच्या सुधारित जाती कोणत्या ? पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chana Variety : खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. मान्सून आता माघारी फिरू लागला आहे. राज्यातील जवळपास 45% भागातून मान्सून माघारी फिरला असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील विविध भागांमधून मान्सून परतला आहे.

दरम्यान हवामान खात्याने येत्या दोन ते तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरेल आणि या कालावधीत राज्यातील काही भागात परतीचा पाऊस बरसेल असे सांगितले आहे.

दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आगामी दोन ते तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरीत महाराष्ट्राचा विचार केला असता उर्वरित महाराष्ट्रात मात्र हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.

अशातच आता रब्बी हंगामासाठी पूर्वमशागतीची कामे देखील सुरू झाली आहेत. दरम्यान या रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात चना अर्थातच हरभरा लागवड होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण चण्याच्या सुधारित जाती जाणून घेणार आहोत.

हरभऱ्याच्या सुधारित जाती खालील प्रमाणे

विजय : हा वाण महाराष्ट्रात पेरणीसाठी शिफारशीत करण्यात आलेला आहे. जिरायती भागात 85 ते 90 दिवस आणि बागायती भागात 105 ते 110 दिवसात हा वाण परिपक्व होतो. जिरायती भागात सरासरी 14 आणि बागायती भागात सरासरी 23 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन या जातीपासून मिळू शकते. काही शेतकऱ्यांनी याहीपेक्षा अधिकचे उत्पादन या जातीच्या लागवडीतून मिळवले आहे.

विशाल : हा देखील हरभऱ्याचा एक सुधारित वाण आहे. या वाणाची लागवड पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केले जाते. हा वाण पश्चिम महाराष्ट्रात पेरणीसाठी शिफारशीत करण्यात आला आहे. या जातीपासून जिरायती भागात 13 क्विंटल आणि बागायती भागात 20 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळू शकते.

दिग्विजय : हा वाण महाराष्ट्रात पेरणीसाठी उपयुक्त आहे. या वाणाची महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आली आहे. हा वाण पेरणीनंतर साधारणता 110 ते 115 दिवसात काढण्यासाठी तयार होतो. जिरायती भागात 14 क्विंटल आणि बागायती भागात सरासरी 23 क्विंटल पर्यंतचे उत्पादन या जातीपासून मिळू शकते.

फुले विक्रम : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ने विकसित केलेला हा महाराष्ट्रात उत्पादित होणारा एक प्रमुख हरभरा वाण आहे. या जातीचा पीकपरिपक्व कालावधी हा सरासरी 105 ते 110 दिवसांचा असतो. जिरायती भागात या जातीपासून 16 आणि बागायती भागात या जातीपासून हेक्टरी 22 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा