Central Railway Recruitment 2023 : दिवाळीचा सण मात्र बारा दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे आपल्या राज्यासह संपूर्ण देशभरात आनंदाची लाट उसळली आहे. सर्वत्र आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. अशा या प्रसन्न वातावरणात आणि सणासुदीच्या काळात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे.
ज्या तरुणांना रेल्वेत नोकरी करायची असेल अशा तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी राहणार आहे. कारण की, मध्य रेल्वे, सोलापूर अंतर्गत काही रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याची अधिसूचना देखील निर्गमित झाली आहे.
तसेच या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. इच्छुकांना आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. पण दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता आपण या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
कोणत्या आणि किती रिक्त पदांसाठी होणार भरती
विजिटिंग स्पेशालिस्ट या पदाच्या एकूण नऊ रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदवीधारक पोस्ट ग्रॅज्युएशन पदवीधारक + संबंधित कामातील किमान 3 वर्ष अनुभव असलेले उमेदवार पात्र राहणार आहे.
याशिवाय पीजी डिप्लोमाधारक उमेदवार + संबंधित कामाचा किमान 5 वर्ष अनुभव असलेले उमेदवार पात्र राहणार.
वयोमर्यादा
या पदासाठी किमान 30 आणि कमाल 65 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहतील. आरक्षित उमेदवारांना नियमानुसार सुटणार आहे. तथापि याबाबतची सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिसूचना वाचणे अपेक्षित आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण कोणते
या भरती अंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना सोलापूर येथे नोकरी करावी लागणार आहे.
किती पगार मिळणार बरं?
विजिटिंग स्पेशालिस्ट या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना महिन्याला 52 हजार रुपये एवढा पगार दिला जाणार आहे.
अर्ज कसा करावा लागेल
या भरतीसाठी फक्त आणि फक्त ऑफलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध नाही. मुख्य वैद्यकीय अधीक्षक, मंडल रेल्वे रुग्णालय सोलापूरच्या कार्यालयात इच्छुक आणि पात्र उमेदवारांना दिलेल्या मुदतीत आपला अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक कोणती ?
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना दिलेल्या मुदतीतच अर्ज करावा लागणार आहे. मुदत संपल्यानंतर सादर होणाऱ्या अर्जावर कुठल्याही सबाबीवर विचार होणार नाही याची नोंद घ्यायची आहे.
जाहिरात कुठे पाहणार?
https://drive.google.com/file/d/1tAHEmZdMxMYpf2QUIIl_k7xD7J-fCYda/view या लिंकवर या भरतीची सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे.