आनंदाची बातमी ! ‘या’ दिवशी मध्य रेल्वे चालवणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, मुंबईमधील प्रवाशांना मिळणार दिलासा, कसा असणार रूट ? वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Central Railway News : गेल्या महिन्याचा अर्थातच नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचा मोठा सण साजरा झाला आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली होती.

राज्यातील विविध रेल्वे मार्गांवर सुरू असलेल्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी होती. विशेष म्हणजे रेल्वेने विविध मार्गांवर काही विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला होता.

पण या गाडीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. प्रामुख्याने मुंबई ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या गाड्यांमध्ये सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली.

दरम्यान, या चालू डिसेंबर महिन्यात 7 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूरला भरणार आहे.

सालाबादाप्रमाणे यंदाच्या हिवाळी अधिवेशनाला देखील मुंबईहून नागपूरला जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. किंबहुना मुंबईहून नागपूरला जाणाऱ्यांची संख्या आत्तापासूनच वाढली आहे.

हेच कारण आहे की, वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता आणि हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते नागपूर दरम्यान एक विशेष एक्सप्रेस गाडी चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

यामुळे राजधानी होऊन उपराजधानीला प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सोयीचा होणार आहे. ही विशेष एक्सप्रेस गाडी 2 डिसेंबर 2023 रोजी चालवली जाणार आहे.

ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 2 डिसेंबरला 12:20 वाजता सुटणार आहे आणि दुपारी तीन वाजून 32 मिनिटांनी ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी एकेरी धावणार आहे.

म्हणजे फक्त मुंबई ते नागपूर अशीच धावणार आहे. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी धावणार नाही. दरम्यान या विशेष गाडीला या रेल्वे मार्गावरील सर्वच महत्त्वाचे रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेने केला आहे.

ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तीजापुर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेईल अशी माहिती मध्य रेल्वेच्या माध्यमातून समोर आली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा