Cement Price Will Hike : प्रत्येकाचेच आपले स्वतःचे हक्काचे घर असावे जिथे आपले उर्वरित आयुष्य मनमुरादपणे घालवता यावे असे स्वप्न असते. आपल्यापैकी अनेकांचे स्वतःच्या हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण झाले असेल तर काही लोक अजूनही या स्वप्नांसाठी अहोरात्र कष्ट करत असतील.
जर तुमचेही अजून घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण झालेले नसेल आणि येत्या काही महिन्यात तुम्ही तुमच्या स्वतःच्या हक्काच्या घराच्या बांधणीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी चिंताजनक बातमी समोर येत आहे. खरं तर घर बांधण्यासाठी सिमेंट, वाळू आणि विटा हे तीन घटक महत्त्वाचे असतात.
याशिवाय लोखंड देखील घरबांधणीसाठी महत्त्वाचे असते. मात्र आता ऑक्टोबर पासून सिमेंटच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे घर बांधण्याचे स्वप्न महाग होणार आहे. वास्तविक, सध्या पावसाळा सुरू असल्याने बहुतांशी कन्स्ट्रक्शन साईट बंद आहेत. पावसाळ्यामुळे बांधकामाची कामे मोठ्या प्रमाणात मंदावली आहेत.
मात्र पुढल्या महिन्यापासून कन्स्ट्रक्शन साईट पुन्हा एकदा नवीन जोमाने सुरू होणार आहेत. अशातच आता सिमेंटच्या किमतीत वाढ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक ऑक्टोबर 2023 पासून अर्थातच येत्या दोन दिवसात सिमेंटच्या किमती वाढणार आहेत.
सिमेंटच्या किमती प्रति बॅग 50 रुपयांपर्यंत वाढणार असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. साहजिकच यामुळे सिमेंटसाठी अधिकचा खर्च करावा लागणार आहे. परिणामी घर बांधण्याचे बजेट मागणार आहे. दरम्यान सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या दरात होणाऱ्या वाढीबाबत डीलर्सला पूर्वकल्पना दिली आहे. एक बॅग सिमेंटसाठी मोजावे लागतील इतके रुपये
देशातील सिमेंट कंपन्यांनी उत्पादनाचा खर्च वाढल्याने सिमेंटचे दर वाढणार असल्याचे नुकतेच स्पष्ट केले आहे. खरंतर ऑगस्टपर्यंत सिमेंटच्या किमती बऱ्यापैकी नियंत्रणात होत्या. ऑगस्टमध्ये सिमेंट 310 ते 320 रुपये प्रति बॅग या दरात विकले जात होते. पण सप्टेंबर महिन्यात सिमेंटच्या किमतीत मोठी वाढ झाली.
1 सप्टेंबरपासून सिमेंटची किंमत 50 रुपयांपर्यंत वाढली. अर्थातच सध्या सिमेंटची एक बॅग 350 रुपयांपर्यंत विकली जात आहे. मात्र आता यामध्ये आणखी 50 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. सिमेंटच्या किमती 400 रुपये प्रति बॅग पर्यंत पोहोचतील अशी माहिती समोर येत आहे. यामुळे साहजिकच सर्वसामान्यांच्या स्वप्नाला सिमेंटचे ग्रहण लागणार असल्याचे चित्र तयार होणार आहे.