Canara Bank FD Scheme : अलीकडे गुंतवणुकीसाठी एफडी योजनेला विशेष महत्त्व दिले जात आहे. FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. याचे कारण म्हणजे आता मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळत आहे.
बँकेकडून मुदत ठेव योजनेसाठी चांगले व्याजदर ऑफर केले जात आहे. अशातच नुकत्याच काही दिवसांपूर्वी एसबीआयचे एमडी अश्विनी कुमार तिवारी यांनी आगामी काळात बँका एफडीचे व्याजदर आणखी वाढवणार असा विश्वास व्यक्त केला आहे.
अशातच काल एचडीएफसी बँकेने एफडीच्या व्याजदरात सुधारणा केली आहे. बँका ग्राहकांना एफडी करण्यासाठी आकर्षित करणे हेतू व्याजदरात सुधारणा करणार असे बोलले जात आहे.
त्यामुळे भविष्यात गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफडीकडे आणखी मोठ्या प्रमाणात आकर्षित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज आपण कॅनरा बँकेच्या 444 दिवसांच्या एफडी योजनेबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कॅनरा बँकेच्या 444 दिवसाच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूकदारांना किती व्याज मिळते, वरिष्ठ नागरिकांना या योजनेतून किती परतावा मिळतो ? हे आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
444 दिवसाच्या मुदत ठेव योजनेचे व्याजदर
कॅनरा बँकेकडून ऑफर केल्या जाणाऱ्या या मुदत ठेव योजनेत गुंतवणूकदारांना 7.25% एवढे व्याजदर ऑफर केले जात आहे.
विशेष बाब अशी की, 444 दिवसाच्या मुदत ठेव योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अतिरिक्त व्याजदर देखील उपलब्ध होत आहे.
अर्थातच जर या योजने ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केले तर त्यांना 7.75 टक्के एवढे व्याजदर ऑफर केले जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना यातून अधिकची कमाई होणार आहे.
5 लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार ?
ही कॅनरा बँकेची सर्वात जास्त व्याज देणारी एफडी स्कीम आहे. जर या स्कीम मध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने पाच लाख रुपये गुंतवले तर त्याला किती रिटर्न मिळणार ? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सदर गुंतवणूकदाराला 7.25% व्याजदराने मॅच्युरिटीवर पाच लाख 44 हजार रुपयांचे रिटर्न मिळणार आहेत.
यामध्ये 44 हजार रुपये व्याजाचे राहणार आहेत आणि पाच लाख रुपये गुंतवणूक राहणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना मात्र यापेक्षा अधिकची रक्कम मिळणार आहे. कारण की, त्यांना जास्तीचे व्याजदर दिले जाणार आहे.