Canara Bank FD Scheme : अलीकडे गुंतवणुकीसाठी एफडीचा ऑप्शन सर्वात सुरक्षित आणि सोपस्कार बनला आहे. विशेष म्हणजे एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा देखील मिळत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार आता एफडी करण्यास विशेष प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.
अनेक बँकांनी गेल्या काही महिन्यांमध्ये एफडीच्या व्याजदरात मोठी वाढही केली आहे. कॅनरा बँक देखील आपल्या ग्राहकांना एफडी साठी चांगले व्याज ऑफर करत आहे. बँकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना एफडी साठी 0.50 टक्के अधिकचे व्याज दिले जात आहे.
दरम्यान आज आपण कॅनरा बँक ग्राहकांना 444 दिवसांच्या एफडी साठी किती व्याज देते, जर एखाद्या ग्राहकाने या बँकेतील 444 दिवसांच्या एफडी मध्ये पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला किती रिटर्न मिळणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कॅनरा बँक एफडीसाठी किती व्याज ऑफर करते
देशातील अनेक प्रमुख बँका एफडी साठी चांगले व्याज ऑफर करत आहेत. कॅनरा बँक देखील आपल्या ग्राहकांना चांगले व्याज देत आहे.
444 दिवसाच्या एफडीसाठी बँकेतून 7.25% एवढे व्याज दिले जात आहे. ही कॅनरा बँकेची सर्वात जास्त परतावा देणारी एफडी योजना आहे.
जरी या योजनेत एखाद्याने पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटीवर अर्थातच 444 दिवस पूर्ण झाल्यानंतर पाच लाख 44 हजार रुपये मिळणार आहेत.
अर्थातच या एफडी योजनेतून 444 दिवसांनी 44 हजार रुपयांचा परतावा गुंतवणूकदारांना मिळणार आहे.
विशेष म्हणजे ज्येष्ठ गुंतवणूकदारांना या एफडी योजनेसाठी बँकेच्या माध्यमातून 0.50 टक्के अधिकचे व्याज ऑफर केले जात आहे.
याचाच अर्थ ज्येष्ठ नागरिकांना या एफडी करिता 7.75 टक्के एवढे व्याज मिळणार आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या योजनेतून चांगला परतावा मिळू शकणार आहे.
निश्चितच ज्यांना एफडी मध्ये गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी कॅनरा बँकेच्या या एफडी योजनेचा पर्याय सर्वोत्कृष्ट ठरू शकतो.