एका चुकीने झालं होत्याच नव्हतं…; अब्जाधीश आला रस्त्यावर ! अब्जावधींची कंपनी फक्त 73 रुपयाला विकली, इंडियन बिझनेसमॅनचा सूर्यास्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Businessmen BR Shetty : आपल्याकडे माडीची काडी आणि काडीची माडी होण्यास उशीर लागत नाही अशी एक म्हण आहे. काही चुकांमुळे राजाचा रंक आणि काही चांगल्या कामांमुळे रंकचा राजा होतो. अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील, अशा उदाहरणांबाबत आपण ऐकले तर नक्कीच असेल. UAE मधील भारतीय वंशाचे प्रसिद्ध उद्योगपती बी आर शेट्टी यांच्याबाबत देखील असंच घडलं आहे.

त्यांच्या काही चुकांमुळे त्यांच्या माडीची काडी झाली आहे. काही चुकीच्या धोरणांमुळे एकेकाळी अब्जाधीश असलेला मूळचा भारतीय वंशाचा आणि संयुक्त अरब अमिराती अर्थातच UAE येथे स्थित असलेला हा प्रसिद्ध उद्योगपती आज रस्त्यावर आला आहे. या उद्योगपतीच्या व्यवसायाचा शेवट एवढा खराब होईल याची कोणीच कल्पना केली नव्हती. मात्र असे घडले आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या प्रसिद्ध उद्योगपतीला आपल्या अब्जावधी रुपयांचा व्यवसाय मात्र 73 रुपयाला विकावा लागला आहे. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही मात्र बी आर शेट्टी यांच्या समवेत घडलेली ही घटना 100% खरी आहे. ही घटना व्यक्तीच्या कर्माचे फळ व्यक्तीला भोगावेच लागते याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण सेट करत आहे. दरम्यान आज आपण या प्रसिद्ध उद्योगपतीच्या डाऊनफॉल बाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

बीआर शेट्टी यांची Finablr PLC ही एक प्रतिष्ठित कंपनी होती. ही कंपनी गेल्यावर्षी दिवाळखोर झाली. या कंपनीला इजराइलच्या प्रिझम ग्रुपच्या उपकंपनीने खरेदी केले आहे. शेट्टी यांची कंपनी वित्तीय सेवा पुरवणारी एक प्रतिष्ठित आणि नामांकित कंपनी होती. UAE च्या वित्तीय सेवांमध्ये अग्रगन्य असलेल्या कंपन्यांमध्ये या कंपनीचा समावेश केला जात असे.

मात्र बी आर शेट्टी यांच्या काही चुकीच्या निर्णयामुळे आणि अनैतिक धोरणांमुळे त्यांच्यावर अब्जावधी डॉलरचे कर्ज झाले. याशिवाय त्यांच्यावर अनेक फसवणुकीचे आरोप ही झाले. या फसवणुकीबाबत सध्या त्यांच्यावर चौकशी सुरू आहे. मात्र यामुळे कंपनीचे बाजार मूल्य कमी झाले असून त्यांना आपली कंपनी विकावी लागली आहे.

कसं उभारल UAE मध्ये साम्राज्य?

मिळालेल्या माहितीनुसार, शेट्टी सत्तरच्या दशकात आठ डॉलरमध्ये संयुक्त अरब अमिरातीत पोहोचले. त्यांनी तिथे गेल्यानंतर हेल्थकेअर इंडस्ट्रीत मोठे नाव कमावले. आखाती देशातील हेल्थकेअर इंडस्ट्रीज त्यांनी आपला ठसा उमटवला. आपल्या दूरदृष्टीने त्यांनी 1970 मध्ये एन एम जी हेल्थ या कंपनीची सुरुवात केली.

ही कंपनी काही वर्षांच्या मेहनतीने लंडन स्टॉक एक्सचेंज मध्ये सूचीबद्ध करण्यात यशस्वी ठरली. यामुळे शेट्टी यांचे मोठे नाव झाले. शेट्टी यांनी 1980 मध्ये अमिरातीचा सर्वात जुना रेमीटन्स व्यवसाय UAE एक्सचेंज सुरू करण्याशिवाय फूड अँड बेवरेजेस, औषध निर्मिती आणि रिअल इस्टेट मध्ये देखील काम सूरु केले. मात्र, एन एम सी हेल्थ आणि अमिरातीतल्या कंपन्यांविरोधात सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला.

त्यानंतर शेट्टी यांची अडचण वाढली. शेट्टी यांना UAE सोडावी लागली. सध्या त्यांच्या कंपन्यांविरोधात कमीत कमी पाच प्रकरणावर चौकशी सुरू आहे. शेट्टी यांच्यावर आधीपासूनच खूप कर्ज होते आणि त्यानंतर फसवणुकीचा आरोप त्यांच्यावर झाला. यामुळे त्यांच्यावर चौकशी सुरू झाली. याचा परिणाम असा झाला की त्यांच्या शेअर्सवर स्टॉक एक्सचेंज मध्ये खरेदी करण्यास बंदी घालण्यात आली.

काही वर्षांपूर्वी Finablr या कंपनीचे बाजार मूल्य दोन अब्ज डॉलर होते तर कंपनीवर जवळपास एक अब्ज रचे डॉलरचे कर्ज झाले होते. परिणामी या कंपनीची विश्वासार्हता संपुष्टात आली. यामुळे दोन देशांद दरम्यान स्थापन झालेल्या कन्सोरटीयमने ही कंपनी ताब्यात घेण्यात निर्णय घेतला. मीडिया रिपोर्ट नुसार शेट्टी यांनी दुबईच्या प्रसिद्ध बुर्ज खलिफा इमारतीत दोन मजले घेतले होते. एका अहवालामुळे त्यांचे संपूर्ण साम्राज्य नेस्तनाभूत झाले.

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मंडी वॉटर रिसर्चेचे संस्थापक आणि लेखक कार्स अँड ब्लॉक यांनी एक अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी शेट्टी यांच्या कंपनीची पोलखोल केली. त्यांच्यावर विविध फसवणूकीचे आरोप लावण्यात आले. अशा तऱ्हेने भारतीय वंशाच्या या प्रसिद्ध उद्योगपतीचा सूर्यास्त झाला. यामुळे माडीची काडी केव्हा होईल आणि काडीची माडी केव्हा होईल हे काही सांगता येत नाही.

पण जर नैतिकता बाळगली, नैतिकतेने कामे केलीत, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात नीतिमत्ता गहाण ठेवली नाही तर यशाला साबुत ठेवता येते. मात्र जर कर्मात खोटं राहिली तर शेट्टी यांच्याप्रमाणे सूर्यास्त होण्यासही वेळ लागत नाही. यामुळे शेट्टी यांची ही कहाणी जीवनात नैतिकता किती महत्त्वाची आहे हे अधोरेखित करण्यासाठी खूपच मोलाची ठरते.