Farmer succes story : सध्या भारतीय शेतीत (Farming) मोठा आमूलाग्र बदल बघायला मिळत आहे. यामध्ये विशेषता शेती व्यवसायात तरुण वर्गाचा समावेश होणे हा एक मोठा बदल मानला जात आहे.
याव्यतिरिक्त शेतकरी बांधव (Farmer) पीकपद्धतीत मोठा बदल करत असल्याचे देखील बघायला मिळत आहे. यामुळे भारतीय शेती आता पूर्णतः बदलली असून भारतीय शेतकरी बांधव आता सधन होण्याच्या मार्गावर आहेत.
शेतीमध्ये अपार कष्टांच्या जोडीला योग्य नियोजनाची सांगड घातली तर मात्र अवघ्या तीनशे खजूरच्या झाडात 15 लाखांची कमाई केली जाऊ शकते हेच सिद्ध करून दाखवले आहे दुबई मधून परतलेल्या अन एकेकाळी बिझनेस मॅन असलेल्या एका अवलिया शेतकऱ्याने.
राजस्थानच्या बाडमेर येथील गिरधारीलाल जांगिड़ नामक अवलिया शेतकऱ्याने 300 खजूरच्या झाडातून (Date Farming) 15 लाखांची कमाई करण्याची किमया साधली आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, बाडमेरचे गिरधारी लाल 40 वर्षांपूर्वी दुबईला गेले होते.
तिथे त्यांचा लाकडाचा व्यवसाय होता. दुबईला असताना त्यांनी तेथे खजुराची शेती आपल्या डोळ्यांनी पाहिली. खजूर शेती समजून घेतली अन मग काय बिजनेसमॅन माणसाचा दिमाग लावला अन मायदेशी परतण्याचा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला.
गिरधारीलाल यांनी आपले सामान बांधले आणि 2010 साली दुबईमधून आपल्या व्यवसायाला राम-राम ठोकत आपला देश, आपला वतन गाठला.
येताना गिरधारीलाल बाबूंनी 300 खजुराची रोपे देखील आणली. मग काय दुबईचे खजूर आपल्या स्वदेशी मातीत रुजवले गेले अन बाडमेरच्या परिसरात खजूर शेती सुरू केली नव्हे-नव्हे तर ती यशस्वी देखील करून दाखवली.
लागवड केल्यानंतर पहिल्या 4 वर्षांत एकही फळ आले नाही, मात्र हाडाचा बिजनेसमॅन माणूस निराश झाला नाही. रोपांची निगा राखली.अखेर मेहनत फळाला आली आणि खजूर मिळू लागले.
आता गिरधारी दरवर्षी 15 लाख किमतीच्या खजूर देशातील विविध राज्यांमध्ये विकत आहेत. 2014 मध्ये पहिल्यांदा खजूरचं उत्पादन मिळालं गिरीधारी यांचा मुलगा हरीश जागिड यांनी सांगितले की, 2010 मध्ये 12 बिघामध्ये 300 खजूर रोपे लावली होती.
चार वर्षे पाणी आणि खत देऊन झाडांची काळजी घेतली. 2014 मध्ये पहिल्यांदा पीक सापडले. तेव्हापासून दरवर्षी खजुराच्या उत्पादनात वाढ होत आहे.
आता प्रत्येक हंगामात 3 ते 4 टन उत्पादन मिळते. गेल्या हंगामात 40 टन खजुराची विक्री झाली होती. ठिबक सिंचन प्रणालीद्वारे पाणी व्यवस्थापन हरीश जांगीड यांच्या मते, खजुरच्या पिकासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करीत आहेत.
खजुराच्या झाडांना थेंब थेंब पाणी दिले जाते. यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येतो आणि सर्व झाडांना समान पाणी मिळते. विशेष म्हणजे कितीही गरम असले तरी खजूरला काही फरक पडत नाही. पावसात खजुरांची विशेष काळजी घ्यावी लागते.
जास्तीच्या पाण्यात खजुरांचे संरक्षण करण्यासाठी खजुरांवर पॉलिथीन बांधले जाते. खजुर काढणीनंतर काळजी घेणे महत्वाचे खजूर पिकल्यानंतर खुडले जातात, खुडल्यानंतर खजूर खूप मऊ असतात. अशा वेळी थोडेसे दाबले तरी ते खराब होते.
त्यासाठी त्यांना पॉलिथिन आणि प्लास्टिकपासून बनवलेल्या घुमटात ठेवले जाते. सुमारे दीड दिवस घुमटात ठेवल्यानंतर खजूर पिकतात.
यानंतर, ते आकारानुसार स्वतंत्रपणे पॅक केले जातात. प्रत्येक वनस्पतीची संख्या, लोकांना प्रशिक्षण देते हरीश जांगीड यांनी सांगितले की, खजूर लागवडीसाठी 10 जणांची गरज आहे.
ऑफ सीझनमध्येही 3-4 जणांची टीम देखरेख करत असते. कोणत्या झाडावर कधी काम करायचे हे लक्षात ठेवण्यासाठी झाडाच्या माथ्यावर नंबरिंग देखील केले जाते.
गिरधारी लाल शेतकऱ्यांना शेतीचे प्रशिक्षणही देतात. आजूबाजूच्या अनेक शेतकऱ्यांनीही येथून रोपे घेतली आहेत. निश्चितच दुबई रिटर्न या बिजनेसमॅनचे हे नेत्रदीपक यश इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे आहे.