Business Loan : अलीकडे अनेकांना स्वतःचा व्यवसाय थाटायचा असतो. मात्र व्यवसाय सुरू करताना सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे व्यवसायासाठी लागणारे भांडवल.
परंतु देशातील अनेक बँका आता व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. व्यवसायासाठी बँकेच्या माध्यमातून बिझनेस लोन सहजतेने दिले जात आहे. मात्र, बिझनेस लोन घेताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे जेणेकरून बिजनेस लोन लवकर मंजूर होईल.
बिझनेस लोन घेताना बँकेकडून या गोष्टी तपासल्या जातात
बिजनेस किती जुना आहे : कोणत्याही बँकेकडे तुम्ही बिझनेस लोनसाठी अप्लाय केले तर त्या बँकेच्या माध्यमातून तुमच्या बिझनेसची हिस्ट्री तपासली जाते. म्हणजे तुमचा व्यवसाय किती जुना आहे हे बँक आधी तपासते.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांचा व्यवसाय किमान 1 ते 3 वर्ष जुना आहे अशा लोकांना बँकेकडून बिझनेस लोन मिळते. जर समजा व्यवसाय सुरू करून फक्त 6 महिने झाले असतील तर अशांना बिझनेस लोन मिळणार नाही.
कोणता व्यवसाय करता : बँका बिझनेस लोन मंजूर करण्यापूर्वी बिझनेसची संपूर्ण माहिती पाहतात. बिजनेस कोणत्या इंडस्ट्रीशी संबंधित आहे, याची माहिती काढली जाते. जेव्हा बिजनेस चांगला ग्रोथ होईल अशी शाश्वती बँकेला वाटते तेव्हाच बिझनेस लोन मंजूर होते.
वार्षिक कमाई सुद्धा तपासली जाते : बँकेकडून कोणत्याही व्यक्तीला बिजनेस लोन देण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या व्यवसायाची वार्षिक कमाई तपासली जाते. जर कमाई चांगली असेल आणि बँकेला दिलेले लोन सदर व्यक्ती फेडू शकेल याची शाश्वती वाटली तर बँकेकडून कर्ज मंजूर होत असते.
क्रेडिट हिस्ट्री सुद्धा चेक होते : बँकेकडून व्यवसायाची क्रेडिट हिस्टरी चेक केली जाते. म्हणजे या व्यवसायासाठी आधी कुठे कर्ज घेतले होते आणि त्या कर्जाची परतफेड कशी झाली आहे याची तपासणी बँक करते.
बिजनेसचे पेपर चेक केले जातात : बिझनेस लोन मंजूर करण्यापूर्वी बँका बिजनेसचे पेपर चेक करते. बिझनेस संबंधित असणारे सर्व दस्ताऐवज जर यथायोग्य असतील तर बँकेकडून कर्ज मंजूर होते नाहीतर कर्ज नाकारले जाते.
बिजनेसचे ताळेबंद, नफा/तोटा स्टेटमेंट, कॅश फ्लो स्टेटमेंट, बँक स्टेटमेंट, आयटीआर, व्यवसाय परवाना यासारखी कागदपत्रे बँकेला सादर करावी लागतात.
मालमत्ता तारण ठेवावी लागते : बिझनेस लोन घेताना बँकेकडे मालमत्ता तारण ठेवावी लागते. बँकेकडून मालमत्तेच्या आधारावरच कर्ज मंजूर होते. यामुळे जर तुम्हाला जास्तीचे बिजनेस लोन हवे असेल तर तुमच्याकडे तशी मोठी मालमत्ता असणे अनिवार्य आहे.