Business Idea : तुम्ही व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहात का, पण कोणता व्यवसाय सुरू करावा हे सुचत नाहीये ? मग आजची बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण एका भन्नाट बिजनेस आयडिया बाबत जाणून घेणार आहोत.
खरंतर अलीकडे नोकरी ऐवजी व्यवसायाला प्राधान्य मिळत आहे. अनेकांना स्वतःचा, हक्काचा व्यवसाय सुरू करायचा आहे. यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये देशातील स्टार्ट अपची संख्या वाढली आहे.
यातील काही स्टार्टअप चांगली कमाई करत आहेत तर काही स्टार्टअप फेल झाले आहेत. दरम्यान जर तुम्हीही चांगल्या कमाईसाठी व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी पोहा मॅन्युफॅक्चरिंग बिजनेस फायदेशीर ठरणार आहे.
या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे तुम्ही हा व्यवसाय फक्त आणि फक्त पाचशे स्क्वेअर फुट जागेत सुरू करू शकता. एकदा व्यवसाय सुरू झाला की तुम्हाला यातून लगेचच कमाई सुरू होणार आहे.
या व्यवसायातून महिन्याकाठी दीड लाखांपर्यंतची कमाई होईल असा दावा केला जातो. अशा परिस्थितीत आज आपण पोहा मॅन्युफॅक्चरिंग बिजनेसची संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पोहा मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस
पोहा हा भारतीय स्वयंपाक घरातील एक मुख्य पदार्थ आहे. पाहुणे-रावळे आले की आवर्जून पोहे बनवले जातात. याशिवाय हॉटेल इंडस्ट्री मध्ये देखील पोह्याला मागणी आहे. भारतीय स्वयंपाक घरात पोहे पासून वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवले जातात.
हॉटेल इंडस्ट्री मध्ये देखील वेगवेगळ्या पदार्थांमध्ये पोह्याचा वापर होतो. यामुळे या पदार्थाला बाजारात बारा महिने मागणी असते. हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम जागा शोधावी लागणार आहे.
जर तुमच्याकडे स्वतःची जागा असेल तर अतिउत्तम. या व्यवसायासाठी तुम्हाला पाचशे स्क्वेअर फुटपर्यंतची जागा लागणार आहे. याशिवाय तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पोहा मेकिंग मशीन, भट्टी, पॅकेजिंग मटेरियल, रॉ मटेरियल यांसारख्या वस्तूंची गरज भासणार आहे.
किती गुंतवणूक करावी लागणार
हा बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला शेड तयार करावे लागणार आहे. याशिवाय या बिझनेससाठी मशीन्स लागतील. वर्किंग कॅपिटल देखील लागणार आहे. यामुळे या बिजनेससाठी जवळपास सहा लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते. सहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू होऊ शकतो.
किती कमाई होणार
या व्यवसायातून महिन्याकाठी दीड लाख रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय. मात्र असेले तरी या व्यवसायातून मिळणारा नफा हा सर्वस्वी सेलिंग वर आधारित राहणार आहे. जेवढी मटेरियलची विक्री होईल तेवढाच अधिक नफा तुम्हाला या व्यवसायातून मिळणार आहे.