Business Idea : अलीकडे भारतीय तरुणांचा माईंडसेट चेंज झाला आहे. आधी नवयुवक तरुण नोकरीला विशेष महत्त्व देत असत. पण, कोरोना महामारीच्या काळापासून नोकरी ऐवजी व्यवसायाला विशेष महत्त्व दाखवले जात आहे. याचे कारण म्हणजे कोरोना नंतर अनेक नामांकित कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ दिलेले आहे. यामुळे आता नोकरीमध्ये शाश्वती राहिली नसल्याची ओरड होऊ लागली आहे.
हेच कारण आहे की आता नोकरी ऐवजी छोटासा का असेना पण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याला प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान जर तुम्हीही नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की, आज आपण अशाच एका नवीन व्यवसायाची माहिती जाणून घेणार आहोत.
आज आपण ज्या बिजनेस प्लॅनची माहिती पाहणार आहोत तो व्यवसाय फक्त दहा हजार रुपयांच्या नाममात्र गुंतवणुकीत सुरू करता येणार आहे. हा असा व्यवसाय आहे, ज्यामध्ये 50 टक्क्यांपर्यंत नफा मिळू शकतो. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बिजनेस बाबत सविस्तर माहिती.
कोणता आहे तो व्यवसाय
आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलत आहोत तो व्यवसाय आहे, बुक स्टेशनरी शॉपचा. तुम्ही शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना शाळा-कॉलेजांच्या आजूबाजूच्या स्टेशनरीच्या दुकानांवर नेहमीच मोठी गर्दी पाहिली असेल. दरम्यान जर तुम्हीही नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल आणि कमी गुंतवणुकीत बिजनेस चालू करायचा असेल तर तुम्ही देखील स्टेशनरी शॉप ओपन करू शकता.
स्टेशनरी वस्तूंना नेहमीच खूप मागणी असते. यामुळे हा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. स्टेशनरी शॉपवर तुम्ही नोटबुक, बुक, पेन, पेन्सिल, पॅड, दप्तर, कंपास, पाणी बॉटल, लहान मुलांसाठी गिफ्ट, नॅपकिन, यासोबत तुम्ही विद्यार्थ्यांचे कपडे, बूट अशा असंख्य वस्तू विक्रीसाठी ठेवू शकता.
एवढेच नाही तर ग्रीटिंग कार्ड, गिफ्ट कार्ड, कव्हर, मोबाईल कव्हर असे सामान देखील विक्रीला ठेवले जाऊ शकते. तुम्ही लेडीज आर्टिकल देखील विक्रीसाठी ठेवू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला शाळा किंवा कॉलेज जवळ एक गाळा भाडेतत्त्वावर घ्यावा लागेल.
किंवा भाड्याची जागा घेऊन तुम्ही त्यावर तुमचे शॉप तयार करू शकता. जागा फायनल झाल्यानंतर तुम्हाला या व्यवसायासाठी लायसन्स काढावे लागणार आहे. शॉप ॲक्ट लायसन्स काढून तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात करू शकता.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 50 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागू शकतो. किमान दहा हजार रुपयात हा व्यवसाय सुरू होऊ शकतो. परंतु जर तुम्हाला तुमच्या स्टेशनरी शॉप वर सर्व प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवायच्या असतील तर कमाल 50 हजाराची गुंतवणूक लागणार आहे.
या व्यवसायातून तुम्हाला 50% पर्यंतचा नफा मिळू शकतो. मात्र असे असले तरी तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यात तुमचा नफा कमी ठेवून तुमचा ग्राहक वर्ग मोठा केला पाहिजे. तसेच या व्यवसायातून जर तुम्हाला चांगली कमाई करायची असेल तर तुमच्या व्यवसायाची योग्य पद्धतीने मार्केटिंग तुम्हाला करावी लागणार आहे.
तुमचे शॉप तुम्ही अशा ठिकाणी ओपन करा जिथे नेहमीच विद्यार्थ्यांची गर्दी असते. झेरॉक्स दुकान, सायबर कॅफे किंवा शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी यांच्या आजूबाजूला तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता.