Business Idea : भावांनो नोकरींच्या नादी लागू नका..! घरबसल्या सुरु करा ‘हा’ व्यवसाय होणार लाखोंची कमाई, कसं ते वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea : मित्रांनो अलीकडे नवयुवक नोकरीऐवजी (Job) आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास अधिक प्राधान्य देत आहेत. नोकरीमध्ये अधिक मेहनत आणि कमी पैसा मिळतो. अशा परिस्थितीत आता नवयुवक नोकरीऐवजी उद्योगाला पहिली पसंती दर्शवित असल्याचे चित्र आहे.

मात्र असे असले तरी नवयुवक तरुणांना व्यवसाय (Business News) करायचा असतो मात्र कोणता व्यवसाय करायचा याची कल्पना नसते. हेच कारण आहे की आज आम्ही आपल्या वाचक मित्रांसाठी एका व्यवसायाची (Small Business Idea) भन्नाट कल्पना घेऊन हजर झालो आहोत.

मित्रांनो आज आम्ही ज्या व्यवसायाबद्दल आपणास माहिती सांगणार आहोत तो व्यवसाय घरबसल्या (Village Business Idea) सुरू करता येतो. यामुळे निश्चितच नवयुवकांना घरातूनच लाखों रुपये कमावता (Business Income) येणार आहेत. मित्रांनो अलीकडे बाजारात लसुन आणि अद्रकच्या (Garlic And Ginger Paste Making Business) पेस्टची मागणी मोठी वाढली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही लसुन आणि अद्रक पेस्ट बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या व्यवसायाविषयी काही महत्त्वाच्या बाबी.

आले आणि लसूण पेस्टचा व्यवसाय

या बिझनेस आयडियाच्या यादीत पहिले नाव आहे ‘आले आणि लसूण पेस्ट’ या व्यवसायाचे. मग ती ग्रेव्ही असलेली भाजी असो किंवा मसालेदार नाश्ता असो, आले आणि लसूण शिवाय त्यांची चव पूर्णपणे कमी होते.

मात्र, कामामुळे लोकांकडे आले आणि लसूण पेस्ट घरी तयार करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. आले आणि लसूण पेस्ट बनवण्यासाठी खूप मेहनत आणि वेळ लागतो, म्हणूनच लोक रेडीमेड पेस्ट देखील वापरतात. त्यामुळेच त्याची मागणी बाजारात कायम असते. यामुळे हा व्यवसाय सुरू करून निश्चितच नवयुवक उद्योजक चांगली कमाई करू शकणार आहेत.

या व्यवसायासाठी, आपल्याला कच्चा माल म्हणून फक्त आले आणि लसूण लागेल. मात्र, यासोबत ‘प्रेझर्व्हेटिव्हज’चाही वापर केला जातो, जेणेकरून पेस्ट लवकर खराब होत नाही. याशिवाय, तुम्ही हा व्यवसाय तुमच्या घरातून सुरू करू शकता, फक्त हे लक्षात ठेवा की जागा निवडताना तिथे स्वच्छता असणे आवश्यक आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही मशीन्सचीही गरज आहे. या मशिन्सद्वारे तुम्ही त्याची साले सहज काढू शकता, तसेच ते बारीक करून पॅकही करू शकता.

यातील काही यंत्रे खालीलप्रमाणे आहेत-

वॉटर जेट वॉशर

साल काढण्याचे यंत्र

फ्रूट मिल / क्रशर

पल्पिंग मशीन

पॅकिंग मशीन

वजनाचे यंत्र

सीलर मशीन

स्टेनलेस स्टील टाकी

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही वर दिलेल्या या मशीन्स ऑनलाइन किंवा तुमच्या जवळच्या बाजारात जाऊन सहज खरेदी करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमचे बजेट किती आहे यावर या मशीन्सची खरेदी अवलंबून असते. तुमच्या बजेटनुसार, सुरुवातीला तुम्ही फक्त एक किंवा दोन मशीन खरेदी करून हा व्यवसाय सुरू करू शकता. जर तुमचे बजेट जास्त असेल तर तुम्ही पूर्णपणे ऑटोमॅटिक मशीन देखील खरेदी करू शकता.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment