Business Idea : शेतीत तोटा होतोय का? मग शेतीसोबतच सुरु करा ‘या’ 20 व्यवसायापैकी एक व्यवसाय, होणार लाखोंची कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea : भारतात शेती (Farming) हा मुख्य व्यवसाय (Small Business) आहे. मात्र असे असले तरी देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता शेती (Agriculture) नको रे बाबा असा ओरड करत आहेत. मित्रांनो खरे पाहता गेल्या अनेक दशकांपासून शेतीमध्ये सातत्याने शेतकरी बांधवांना तोटा सहन करावा लागत असल्याने आता शेतकरी बांधव शेती पासून दुरावत असल्याचे चित्र आहे.

जाणकार लोकांच्या मते जर शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केला आणि शेती समवेतच शेतीपूरक व्यवसाय (Agricultural Business) केले तर निश्चितच शेतकरी बांधवांना चांगली कमाई (Farmer Income) होणार आहे. शेतकरी बांधव देखील आता जागृत झाले असून आता शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात शेती पूरक व्यवसाय करत आहेत. आज आपण देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी शेती समवेतच केले जाणारे काही व्यवसायाविषयी माहिती घेऊन हजर झालो. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

1 डेअरी फार्मिंग :- मित्रांनो दूध हे असे उत्पादन आहे ज्याची मागणी सर्वत्र असते. शहरांमध्ये लोक शुद्ध दुधासाठी अधिक पैसे खर्च करण्यास तयार आहेत. शहरात तसेच ग्रामीण भागात देखील दूध व दुग्धजन्य पदार्थांना नेहमीच मागणी असते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे की दही, तूप, पनीर इत्यादी जवळजवळ प्रत्येक घरात वापरली जातात. अशा परिस्थितीत डेयरी फार्मिंग व्यवसाय शेतकरी बांधवांनी सुरू केल्यास त्यांना यातून चांगली कमाई होणार आहे. मात्र, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी उद्योजकाला योग्य प्रमाणात भांडवल आणि डेअरी तज्ज्ञांच्या सल्ल्याची आणि मार्गदर्शनाचीही गरज भासणार आहे. जर शेतकरी बांधवांनी हा शेतीपूरक व्यवसाय योग्य नियोजन करून केला तर निश्चितच त्यांना या व्यवसायातून चांगली कमाई होणार आहे. मित्रांनो खरे पाहता पशुपालन आपल्या देशात गेल्या अनेक दशकांपासून केले जात आहे अशा परिस्थितीत हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी नवखा नाहीय. मात्र असे असले तरी या व्यवसायासाठी तज्ञ लोकांचे मार्गदर्शन घ्यावे लागणार आहे.

2 सेंद्रिय खत तयार करणे :- सेंद्रिय खत निर्मितीचा हा व्यवसाय एक प्रमुख शेतीपूरक व्यवसाय आहे. या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरू केला जाऊ शकतो. या प्रक्रियेत उद्योजक नैसर्गिक आणि घरगुती कचरा इत्यादींचा वापर करत असतो आणि कोणताही उद्योजक ग्रामीण भागातही तो सहज सुरू करू शकतो. सध्या गांडूळ खत आणि सेंद्रिय खत तयार करणे हा घरगुती व्यवसाय झाला आहे. रासायनिक समृद्ध शेतीचे अनेक दुष्परिणाम लोक आणि सरकारांसमोर आहेत, त्यामुळे सरकारही सेंद्रिय खत निर्मितीला प्रोत्साहन देत आहेत. विशेष म्हणजे आता शेतकरी बांधव देखील सजग झाले आहेत आणि सेंद्रिय खत आणि गांडूळ खताचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. मित्रांनो सेंद्रिय शेती दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने सेंद्रिय खताचा हा व्यवसाय निश्चित शेतकऱ्यांना चांगली कमाई करून देणारा ठरणार आहे.

3 खत विक्रीचा व्यवसाय:- भारतात शेती हा मुख्य व्यवसाय आहे हे आपणा सर्वांनाचं ठाऊक आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे शेती करताना तसेच शेतीतून चांगले उत्पादन घेण्यासाठी पिकांना आवश्यक त्यां खतांची पूर्तता करावी लागते. अशा परिस्थितीत खत विक्रीचा व्यवसाय ग्रामीण भागात निश्चितचं शाश्वत उत्पन्नाचे साधन ठरणार आहे. या कृषी व्यवसायाची सुरवात करून उद्योजक मोठ्या शहरांतून खत विकत घेऊन लहान शहरे किंवा ग्रामीण भागात विकू शकतो. परंतु लक्षात ठेवा की उद्योजकाचे दुकान अशा ठिकाणी असावे की ज्या ठिकाणी शेती केली जाते आणि क्षेत्र शेतकरीबहुल आहे. कारण किरकोळ खतांच्या दुकानाचे मुख्य ग्राहक हे शेतकरी आहेत ज्यांना त्यांच्या पिकांसाठी खतांची गरज असते.

4 मशरूम शेती :- मित्रांनो आपल्या देशात अलीकडे मशरूम शेती मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली आहे. खरं पाहता मशरूम शेती कमी जागेत देखील केली जाऊ शकते मात्र मशरूमच्या चांगल्या उत्पादनासाठी छायादार खोल्या आवश्यक असतात. मशरूम मध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळत असल्याने मशरूमला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. मशरूम चवीला देखील उत्कृष्ट असल्याने त्याचा वापर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, घरांमध्ये विविध प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांसाठी मशरूम शेतीचा हा व्यवसाय फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे. कोणत्याही इच्छुक व्यक्तीला हा शेती व्यवसाय कमी वेळात चांगला नफा मिळवून देऊ शकतो. मात्र यासाठी प्रशिक्षण घेण्याचा सल्ला तज्ज्ञ लोकांकडून देण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, अगदी कमी गुंतवणुकीत छोट्या जागेतून सुरुवात करता येत असल्याने अलीकडे आपल्या राज्यात देखील मशरूम शेती मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली आहे. निश्चितच जर तुम्ही देखील शेतीमधून अधिक उत्पन्न मिळवू इच्छित असाल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे.

5 फुलशेती :- खरं पाहता भारत हा उत्सवांचा देश म्हणून संपूर्ण जगात विख्यात आहे. सण किंवा उत्सव म्हटलं की फुलांची आरास आलीच. अशा परिस्थितीत जर शेतकरी बांधवांनी फुल शेती सुरू केली तर निश्‍चितच त्यांना फुलशेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई होण्याची शक्यता आहे. खरं पाहता गेल्या एका दशकापासून फुल शेती मध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील मोठ्या प्रमाणात फुल शेती करू लागले आहेत. मित्रांनो सध्या प्रत्येक कार्यक्रमासाठी, सणाला फुलांची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत फुलांची मागणी बाजारपेठेत बारामाही बघायला मिळते. त्यामुळे तुमच्याकडेही जर काही रिकामी शेतजमीन असेल तर तुम्ही त्या जमिनीत फुलशेती सुरू करू शकता.

6 झाडांची लागवड :- अलीकडे आपल्या देशात वेगवेगळ्या झाडांची लागवड केली जाऊ लागली आहे. खरे पाहता लाकडाचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याने झाडांची लागवड शेतकऱ्यांना बक्कळ पैसा कमवून देत आहे. जर तुम्ही अशा कोणत्याही व्यवसायाबद्दल विचार करत असाल जो दीर्घ कालावधीत चांगला परतावा देण्यास सक्षम असेल, तर ही कृषी व्यवसाय कल्पना तुमच्यासाठी आहे. मित्रांनो खरे पाहता फर्निचर उद्योगात लाकूड मोठ्या प्रमाणात उपयोगात आणले जात असल्याने झाडांची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. विविध प्रकारच्या लाकडाच्या झाडांची लागवड करून उद्योजक पाच ते सहा वर्षांनी चांगला नफा कमवू शकतो. मात्र असे असले तरी झाडांना पूर्णपणे विकसित होण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. मात्र झाडांची लागवड करून एक ठराविक कालावधीनंतर शेतकरी बांधवांना चांगली कमाई होणार आहे.

7 हायड्रोपोनिक रिटेल स्टोअर :– सातत्याने वाढणारी लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणामुळे शेतजमीन सतत कमी होतं चालली आहे. वाढती संख्या लक्षात घेता शेतीचे विभाजन देखील दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांकडे आता कमी शेतजमीन शिल्लक राहिले आहे. असे म्हणतात की गरज ही शोधाची जननी असते या पद्धतीनेच शेतजमीन दिवसेंदिवस कमी होत असल्याने बाजारात आता असे नवनवीन तंत्रज्ञान दाखल होत आहे ज्याच्या मदतीने कमी शेत जमिनीत देखील लाखोंची कमाई करता येणे सहज शक्य झाले आहे. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान हे देखील कमी जागेत अधिक भाजीपाला उत्पादीत करण्याचे सुधारित तंत्रज्ञान आहे. आता हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काही फळबाग पिकांची देखील शेती करता येणे शक्य झाले आहे. यामुळे शेतकरी बांधवांना फायदा होत आहे. या तंत्रज्ञानाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या तंत्रज्ञानाचा वापर शहरात देखील सहज शक्य आहे. या तंत्रज्ञानात शेत जमिनीविना भाजीपाला तसेच फळपिके उत्पादित केली जात असल्याने उत्पादित होणारा शेतमाल हा दर्जेदार असतो. शिवाय या तंत्रज्ञानात पिकांना रोग देखील लागत नाही. अशा तंत्रज्ञानाच्या मदतीने मातीशिवाय वनस्पती आणि पिकांची लागवड केली जाते. अशा परिस्थितीत हायड्रोपोनिक फार्मिंग करून तसेच हायड्रोपोनिक फार्मिंग साठी आवश्यक वस्तूंचा किंवा कृषी निविष्ठांचा पुरवठा करून एका मोठ्या व्यवसायाची सुरुवात केली जाऊ शकते.

7 सेंद्रिय हरितगृह :- मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे गेल्या अनेक वर्षांपासून उत्पादनवाढीच्या अनुषंगाने रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर सुरू झाला आहे. मात्र रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीची सुपीकता तसेच मानवाचे आरोग्य धोक्यात आले आहे. रासायनिक शेतीचे अनेक दुष्परिणाम लोकांसमोर आल्याने सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत आहे. शहरांमध्ये, लोक सामान्य उत्पादनांपेक्षा सेंद्रिय उत्पादनांसाठी अधिक खर्च करण्यास तयार आहेत. त्यामुळे जर तुम्हीही शेती व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सेंद्रिय हरितगृह सुरू करू शकता आणि त्यामध्ये सेंद्रिय उत्पादने तयार करून गरजू लोकांना विकून कमाई करू शकता. यासाठी उद्योजकाला जमीन खरेदी करावी लागू शकते.

8 चहा लागवड :- मित्रांनो भारतात चहाचे सर्वाधिक सेवन केले जाते. चहा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे. विशेष म्हणजे या जागतिकीकरणाच्या काळात सध्या परदेशातही भारतीय चहाची मागणी वाढत आहे. चहाच्या वाढत्या मागणीमुळे शेतकरी बांधव चहाची शेती करून चांगली कमाई करू शकणार आहेत. मात्र चहा शेतीसाठी योग्य हवामान आणि योग्य जमीन असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच चहा लागवड करण्याअगोदर कृषी तज्ञांचा सल्ला घेणे शेतकऱ्यांसाठी बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे उद्योजकाला हवे असल्यास सर्वप्रथम राज्याच्या कृषी विभागाशी संपर्क साधून त्याला ज्या ठिकाणी चहाच्या बागा सुरू करायच्या आहेत त्या ठिकाणचे हवामान व जमिनीनुसार चहाची शेती केली जाऊ शकते. या व्यवसायात भांडवली गुंतवणूक जास्त असते पण नंतर नफाही जास्त असतो.

9 मधमाशी पालन :- भारतात मधमाशीपालन हा एक प्रमुख शेतीपूरक व्यवसाय आहे. मित्रांनो मधाची वाढती मागणी लक्षात घेता हा व्यवसाय शेतकऱ्यांना बक्कळ पैसा कमवून देणारा आहे. मानवी आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मधाची भूमिका महत्त्वाची असते. विशेष म्हणजे आहार तज्ञ देखील मधाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. त्याचे अनेक औषधी उपयोग आहेत यामुळे मधाची बाजारात मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेती सोबतच मधमाशीपालन हा व्यवसाय सुरु करून शेतकरी बांधव चांगली कमाई करू शकतात. मात्र मधमाशी पालन व्यवसाय सुरू करण्याअगोदर प्रशिक्षण घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

10 भाजीपाला आणि फळे यांची निर्यात : भाजीपाला आणि फळे निर्यात करणे म्हणजे भाजीपाला आणि फळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकणे असा नसून एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात भाजीपाला आणि फळे पुरवठा करणे असा आहे. तथापि, जर उद्योजकाची इच्छा असेल तर तो परदेशात देखील फळे आणि भाजीपाला निर्यात करू शकतो. परंतु यासाठी उद्योजकाने आयात निर्यात संहितेव्यतिरिक्त अनेक सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. म्हणून, सुरुवातीच्या टप्प्यात हा कृषी व्यवसाय सुरु करुन शेतकरी बांधव स्थानिक पातळीवरून भाजीपाला तसेच फळांची खरेदी करून इतर राज्यात पाठवू शकतात. हा व्यवसाय शेतकरीच नव्हे तर इतर लोक देखील सहजतेने सुरू करू शकणार आहे.

11 औषधी वनस्पतींची लागवड :- अलीकडे आयुर्वेदावर लोकांचा विश्‍वास वाढत आहे. मित्रांनो आयुर्वेदात औषधी वनस्पतींना मोठे मोलाचे स्थान आहे. अशा परिस्थितीत औषधी वनस्पतींचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ भारतातच नाही तर औषधी वनस्पती विदेशात देखील मोठ्या मागणीत आहेत. यामुळे शेतकरी बांधवांना अतिरिक्त उत्पन्न कमवायचे असेल तर औषधी वनस्पतींची शेती करून शेतकरी बांधव चांगली कमाई करू शकणार आहेत. वनौषधींद्वारे औषधोपचार करण्याची पद्धत खूप जुनी आहे, सध्या वनौषधींपासून बनवलेली औषधे घेण्यास प्राधान्य देणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हेच कारण आहे की देशात अशी अनेक उत्पादक युनिट्स आहेत जी वनौषधींद्वारे विविध प्रकारच्या रोगांवर औषधे तयार करतात. जर तुमच्याकडे पुरेशी जमीन आणि औषधी वनस्पतींबद्दल मूलभूत माहिती किंवा ज्ञान असेल तर तुम्ही औषधी वनस्पतींच्या लागवडीद्वारे भरपूर नफा कमवू शकता. विशेष म्हणजे औषधी वनस्पतींच्या शेतीसाठी मायबाप सरकारकडून प्रोत्साहन दिले जात असून यासाठी वेगवेगळ्या योजना देखील कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

12 मसाल्यांवर प्रक्रिया करणे :- मित्रांनो जर आपणास ठाऊकच आहे भारतात मसाल्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतात मसाल्याची खपत मोठ्या प्रमाणात आहे तसेच भारतात मसाला देखील मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो. मित्रांनो शेतात उत्पादित केलेल्या मसाल्यांवर प्रक्रिया करणे म्हणजे मसाल्यांचे मूळ पावडर स्वरूपात रूपांतर करणे होय. जरी सर्व मसाल्यांचे पावडर स्वरूपात रूपांतर करणे आवश्यक नसले तरी देखील धूळ, माती, खडे इत्यादी काढून टाकल्यानंतर त्यांना पॅक करणे आवश्यक आहे. या शेती व्यवसायात उद्योजक स्थानिक शेतकऱ्यांकडून हळद, मिरची, धने, जिरे, लसूण, आले इत्यादी विविध प्रकारचे मसाले खरेदी करू शकतात, ते बारीक करून पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवू शकतात. मसाल्यांवर प्रक्रिया करण्याची प्रक्रिया फारशी किचकट नसते, त्यामुळे अगदी कमी गुंतवणुकीतून ती सहज सुरू करता येते आणि मसाल्यांची गरज केवळ भारतातच नाही, तर जगातही मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे या व्यवसायातून देखील चांगली कमाई होण्याची शक्यता आहे.

13 शेळीपालन :- मित्रांनो आपल्या देशात कमी खर्चात आणि कमी जागेत सुरू करता येणारा शेळीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. शेळीपालन हा असा शेती व्यवसाय आहे जो प्राचीन काळापासून शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन बनला आहे. अलिकडे शेळीपालन व्यवसायासची व्याप्ती वाढली असून एकेकाळी दुय्यम समजला जाणारा हा व्यवसाय आता प्राथमिक व्यवसाय म्हणून उदयास येत आहे. मित्रांनो दूध आणि मांसाच्या गरजा दिवसेंदिवस वाढत असल्याने या व्यवसायात अधिक संधी असल्याचे सांगितले जाते. खरं पाहता जगभरात शेळीच्या मांसाला मोठी मागणी आहे. शेतकरी बांधव शेळीपालन व्यवसाय करून चांगली कमाई करू शकणार आहेत. स्थानिक पातळीवरही शेळ्यांची मागणी अधिक असल्याने. शेळी विक्रीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होणार आहे.

14 प्रमाणित बियाणे विक्रेते :- मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे कोणत्याही पिकातून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी त्या पिकाच्या सुधारित वाणाचे प्रमाणित बियाणे पेरणे अतिशय आवश्यक आहे. अशा परिस्थितीत सध्या शेतकरी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सुधारित वाणाचे प्रमाणित बियाणे खरेदी करण्यावर अधिक भर देत आहेत. शेतकरी बांधवांना प्रमाणित बियाणे मिळावे यासाठी सरकार अनेक पावले उचलत आहे. जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी सुधारित जातींचे प्रमाणित बियाणे पेरण्यास त्यांचे उत्पादन वाढणार आहे. साहजिकचं त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील दुपटीने वाढणार आहे. तुम्ही शेतकरीबहुल भागात राहात असाल, तर प्रमाणित बियाणे विक्रेता बनणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, जरी यासाठी तुम्हाला काही औपचारिकता कराव्या लागतील, ज्यांचे तपशील तुम्ही तुमच्या राज्याच्या कृषी विभागाकडून घेऊ शकता.

15 कुक्कुटपालन :- मित्रांनो आपल्या देशात कुक्कुटपालन हा व्यवसाय देखील गेल्या अनेक दशकांपासून केला जात आहे. शेतकरी बांधव आपले उत्पन्न वाढविण्यासाठी कुकूटपालन व्यवसाय करत आहेत. सध्या अंडी आणि कोंबडीच्या मांसाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे, यामुळेच कुक्कुटपालन जो की पूर्वी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून केला जात होता, तो व्यवसाय आता उत्पन्नाचे प्रमुख साधन बनला आहे. आता व्यावसायिक स्तरावर कुकुट पालन केले जाऊ लागले आहे. विशेष म्हणजे कुकुट पालन करणाऱ्या शेतकरी बांधवांना चांगली कमाई होत आहे. कुकूटपालन व्यवसायात एकाच पोल्ट्री फार्ममध्ये लाखो पक्षी एकत्र पाळले जातात. या प्रकारचा शेती व्यवसाय अगदी कमी गुंतवणुकीत छोट्या प्रमाणावर सुरू करता येतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या व्यवसायात उद्योजक आपले उत्पादन स्थानिक पातळीवर वाजवी किमतीत सहज विकू शकतो.

16 मत्स्यपालन :- मित्रांनो भारतात मत्स्यपालन हा देखील एक प्रमुख शेती पूरक व्यवसाय म्हणून अलीकडे उदयास आला आहे. माशांची वाढती मागणी लक्षात घेता व्यावसायिकरित्या सुरू केलेला मत्स्यपालन व्यवसाय अतिशय फायदेशीर व्यवसायांच्या यादीत समाविष्ट आहे. विशेष म्हणजे सध्या मत्स्यपालनासाठी विविध तंत्रे उपलब्ध झाली आहेत. या नवीन तंत्रज्ञानाचा वापर मत्स्यपालन करणारे शेतकरी बांधव उत्पादन आणि गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारू शकतो. तथापि, या प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, उद्योजकाला अनेक तांत्रिक गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि त्यात अधिक गुंतवणूक करावी लागेल.

17 माती परीक्षण प्रयोगशाळा :- आपल्या सर्वांना हे चांगलंच माहीत आहे की विविध पिके वेगवेगळ्या मातीत घ्यावी लागतात. अशा परिस्थितीत कोणत्या शेत जमिनीत कोणती पिके घ्यायची यासाठी माती परीक्षण करण्याचा सल्ला दिला जातो. जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना माती परीक्षण केल्यानंतरच खतांची मात्रा देण्याचे तसेच पीक निवडण्याचा सल्ला देत असतात. या कृषी व्यवसायात, उद्योजक आपल्या ग्राहकांना जमिनीतील पोषक घटक तपासण्याची सुविधा प्रदान करतो, याशिवाय उद्योजक विविध पिकांसाठी आवश्यक खतांची शिफारस देखील ग्राहकांना करू शकतो. मात्र माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी इच्छुक व्यक्तीला मायबाप शासनाकडून काही परवाने देखील घ्यावे लागणार आहेत. सरकारी प्रमाणपत्र घेऊनच अशा प्रकारची लॅब सुरू करता येणार आहे.

18 कृषी सल्ला :- मित्रांनो अलीकडे शेती व्यवसायात मोठा बदल झाला आहे. शेतकरी बांधव अलीकडे शेतीमध्ये वेगळे प्रयोग करण्या अगोदर तज्ञ लोकांचा सल्ला घेतात. जर तुम्हाला शेतीच्या कोणत्याही विशिष्ट क्षेत्रात कौशल्य असेल तर तुम्ही कृषी सल्लागार म्हणून काम करू शकता. या व्यवसायात शेतकरी बांधवांना शेतीशी निगडित सर्व प्रकारची माहिती तसाच सल्ला दिला जातो. निश्चितच हादेखील एक शेतीशी निगडित मुख्य व्यवसाय बनू शकतो.

19 पशुखाद्य युनिट :- मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे आपल्या देशात दूध आणि मांसाच्या उत्पादनासाठी पशु पालन केले जाते. याशिवाय काही प्राणी असे आहेत जे ओझे वाहून नेण्याच्या उद्देशाने पाळले जातात. मित्रांनो गाय, म्हशी, शेळी, मेंढ्या, घोडा, गाढव, खेचर इत्यादी प्राण्यांचे पालन करून शेतकरी बांधव चांगले उत्पन्न कमवतात. मात्र पशुपालन व्यवसायात यशस्वी होण्यासाठी त्यांना चांगला आहार देणे आवश्यक आहे. यामुळेच पशुपालक त्यांच्या जनावरांसाठी बाजारात उपलब्ध चारा खरेदी करतात. अशा परिस्थितीत जर पशुखाद्य युनिट सुरू करण्यात आले तर निश्चितच यातून चांगली कमाई करता येणे शक्य आहे.

20 तुळस लागवड:- मित्रांनो तुळशीमधील आयुर्वेदिक गुणधर्म लक्षात घेता अलीकडे तुळशीची मागणीही मोठी वाढली आहे. तुळस विविध औषधे आणि कॉस्मेटिक उत्पादने तयार करण्यासाठी वापरली जाते. साहजिकच यामुळे बाजारात तुळशीला मोठी मागणी असते आणि चांगला बाजारभाव मिळतो. या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे तुळशी लागवडीसाठी अनेक कंपन्या अलीकडे कंत्राट देखील जारी करत आहेत. निश्चितच तुळशीची शेती देखील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न करून देणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment