सोयाबीनला कमी भाव मिळतोय ? मग सुरू करा ‘हा’ सोयाबीन प्रक्रिया उद्योग, महिन्याकाठी होणार लाखोंची कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea Marathi : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून बाजारात सोयाबीनला अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात अपेक्षित असा पाऊस पडला नाही. यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट आली आहे.

एकीकडे उत्पादनात घट आली आहे तर दुसरीकडे बाजारात मालाला फारसा भाव मिळत नाहीये. सध्या सोयाबीनचे दर हमीभावाच्या आसपासच पाहायला मिळत आहेत. याचा परिणाम म्हणून सोयाबीनची शेती आता शेतकऱ्यांना परवडत नाहीये.

यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतील अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. मात्र जर शेतकऱ्यांनी सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू केला तर त्यांना निश्चितच सोयाबीन पिकातून दुहेरी कमाई करता येऊ शकणार आहे.

सोयाबीनवर प्रक्रिया करून जर सोया पनीर बनवण्याचा व्यवसाय सुरू केला तर निश्चितच शेतकऱ्यांना या पिकातून चांगले उत्पादन मिळू शकणार आहे. दरम्यान, आज आपण सोया पनीर बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू केला जाऊ शकतो यासाठी किती गुंतवणूक करावी लागणार याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सोया पनीर प्लांट बसवण्यासाठी किती खर्च येतो

सोया पनीर बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अंदाजे चार लाखांपर्यंतचा खर्च येणार आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी बॉयलर, जार, सेपरेटर, स्मॉल फ्रीझर इत्यादीं मशीन्स लागणार आहेत. यासाठी जवळपास दोन लाखांची गुंतवणूक करावी लागेल. यासोबतच, एक लाख रुपय कच्चामाल खरेदी करण्यासाठी लागणार आहे.

कच्चा माल अर्थातच सोयाबीन जर तुमचे घरचे असेल तर तुम्हाला यासाठी अधिक खर्च करावा लागणार नाही. पण जर सोयाबीन घरचे नसेल तर जवळपास एक लाख रुपये सोयाबीन खरेदीसाठी लागू शकतात. याशिवाय सोया पनीर बनवण्यासाठी काही कुशल कारागिरांची देखील गरज लागणार आहे.

कसा बनतो सोया पनीर

सोया पनीर बनवण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. पण तरीही या व्यवसायासाठी कुशल कारागिरांची गरज मात्र भासणार आहे. सोया पनीर बनवण्याच्या प्रक्रियेत, प्रथम सोयाबीन ग्राईंड केले जाते आणि 1:7 च्या प्रमाणात पाण्यात मिसळले जाते आणि मग हे मिश्रण बॉईल करावे लागते.

बॉयलर आणि ग्राइंडरमध्ये 1 तास प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सोया दूध मिळते. या प्रक्रियेनंतर, दूध सेपरेटरमध्ये टाकले जाते जेथे दूध दह्यासारखे होते. यानंतर उरलेले पाणी त्यातून काढून टाकले जाते. अशा तऱ्हेने सोया पनीर तयार होतो. 

किती कमाई होणार

जर सोया पनीरच्या या प्लांट मधून रोज 30-35 किलो पनीर मिळाला तर या बिजनेस मधून महिन्याकाठी एक लाख रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते. निश्चितच जर तुमच्या सोया पनीरला बाजारात चांगली मागणी राहिली तर तुम्हाला या व्यवसायातून एक पुरेशी अमाऊंट मिळवता येणार आहे.

तथापि व्यवसायातील नफा हा सर्वस्वी तुमच्या सेलिंग स्ट्रॅटेजीवर डिपेंडंट राहणार आहे. जेवढा तुमचा सेल वाढेल तेवढाच तुम्हाला या व्यवसायातून नफा मिळणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा