Business Idea Marathi : तुम्हीही व्यवसाय करण्याच्या तयारीत आहात का मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. अनेकांना व्यवसाय सुरू करायचा असतो मात्र भांडवल नसल्यामुळे त्यांना व्यवसाय सुरू करता येत नाही.
मात्र असेही काही व्यवसाय आहेत जे खूपच कमी गुंतवणुकीत सुरू केले जाऊ शकतात. दरम्यान आज आपण अशाच एका लो इन्वेस्टमेंट बिझनेस प्लॅन विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
आज आपण ज्या बिझनेस प्लॅनची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये फक्त पाच हजार रुपयांची इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि महिन्यासाठी तब्बल 20 हजार रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकणार आहे.
निश्चितच आता तुम्हाला देखील या व्यवसायाची माहिती जाणून घ्यायची असेल, चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या भन्नाट व्यवसायाविषयी सविस्तर.
कोणता आहे तो व्यवसाय?
आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलत आहोत तो व्यवसाय आहे चहापत्तीचा. चहा पत्ती विक्रीचा व्यवसाय तुम्हाला खूपच कमी गुंतवणुकीत सुरू करता येणार आहे. विशेष म्हणजे या व्यवसायातून तुम्हाला हजारो रुपयांची कमाई होणार आहे.
या व्यवसायातून तुम्ही महिन्याकाठी 20 हजार रुपयांपर्यंतची कमाई करू शकता. हा व्यवसाय तुम्ही दोन-तीन प्रकारे सुरू करू शकता. आपल्याकडे आसाम आणि दार्जिलिंग या राज्यांमध्ये चहा पत्तीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही होलसेल मधूनच चहापत्ती खरेदी करून रिटेल मध्ये विकू शकता. तुम्ही आसामसारख्या ठिकाणाहून चहा पत्ती खरेदी करून आणा आणि ही चहा पत्ती तुम्ही तुमच्या लेबलने विकू शकता.
तेव्हा तुम्ही एखाद्या नामांकित चहापत्ती ब्रँडची फ्रॅंचाईजी विकत घेऊन त्यांचे आउटलेट लावून कमिशनवर हा व्यवसाय सुरू करू शकता. यातूनही तुम्हाला चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर तुम्ही हा व्यवसाय डूअर टू डूअर जाऊन देखील सुरू करू शकता.
किती कमाई होणार
तुम्हाला आसाम आणि दार्जिलिंग येथून चहापत्ती 140 ते 180 रुपये प्रति किलो दरात होलसेल मध्ये उपलब्ध होऊ शकते. विशेष म्हणजे ही चहा पत्ती बाजारात 200 ते 300 रुपये प्रति किलो या दरात विकली जाते.
अशा तऱ्हेने तुम्ही या व्यवसायातून महिन्याकाठी 20 हजार रुपयांपर्यंतची कमाई करू शकता. म्हणजेच पाच हजार रुपये खर्च करून तुम्ही महिन्याला वीस हजार कमवू शकता.