दिवसाला फक्त 4-5 तास काम आणि महिन्याकाठी लाखो रुपयांची कमाई ! सुरू करा ‘हा’ भन्नाट व्यवसाय, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea Marathi : सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अशा रुटीन कामामुळे उबगलेली जनता आता व्यवसायाकडे वळू लागली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये नोकरी सोडून व्यवसाय सुरू करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. विशेषता कोरोना काळापासून नोकरी ऐवजी व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे.

नोकरीमध्ये निश्चित कमाई केली जाऊ शकते पण जर अनपेक्षित आणि तगडी कमाई करायची असेल तर व्यवसायाशिवाय पर्याय नाही अशी धारणा आता विकसित होत आहे. हेच कारण आहे की, आता नवयुवक तरुण उच्च शिक्षणानंतरही नोकरी करण्याऐवजी व्यवसायाकडे वळत आहेत. मात्र असे असले तरी अनेक तरुणांना व्यवसाय करण्याची इच्छा असतानाही कोणता व्यवसाय करावा याबाबत सुचत नाही.

अशा परिस्थितीत आज आम्ही अशा तरुणांसाठी एका भन्नाट बिजनेस आयडिया बाबत माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण अशा एका व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत ज्यामध्ये दिवसाला फक्त चार ते पाच तास काम करावे लागेल आणि महिन्याकाठी चांगली लाखो रुपयांची कमाई होऊ शकते.

कोणता आहे तो व्यवसाय ?

आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो आहे सूप मेकिंग बिझनेस. खरंतर, भारतातून मान्सून परतला आहे. यामुळे आता येत्या काही दिवसात थंडीची तीव्रता वाढणार आहे. आणि थंडीच्या काळात आता बाजारात सूपची मागणी वाढणार आहे. यामुळे जर तुम्ही एक शॉप उघडून सूप बनवण्याचा व्यवसाय सुरू केला तर हिवाळ्याच्या काळात चांगली कमाई होणार आहे. जर तुम्हाला कुकिंग चा छंद असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला शहरात एक दुकान सुरु करावे लागणार आहे. यासाठी तुम्हाला सुरुवातीला काही इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. मात्र हा व्यवसाय सुरू करताना गर्दीच्या ठिकाणी व्यवसाय सुरू करा. म्हणजेच शहरातील अशा भागांमध्ये हा व्यवसाय सुरू करा ज्या ठिकाणी बाजारपेठ असेल. बाजारपेठात हा व्यवसाय सुरू केला तर तुमचा व्यवसाय लवकरच ग्रो होणार आहे.

परंतु तुम्हाला सूपचे शॉप खोलण्यासाठी सुरुवातीला थोडीशी अधिक गुंतवणूक करावी लागू शकते. जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे सूप बनवले तर या व्यवसायातून तुम्हाला चांगली कमाई होऊ शकते. विशेष म्हणजे तुम्ही दिवसाला चार ते पाच तास दुकान सुरू ठेवू शकता आणि इतर वेळी तुम्ही आरामही करू शकणार आहात.

किती कमाई होऊ शकते?

एक बाउल सूप बनवण्यासाठी जवळपास दहा ते पंधरा रुपये कॉस्ट येते आणि हे एक बाऊल सुरू 40 ते 50 रुपयाला विकले जाते. मात्र यासाठी तुमचे सुख चांगल्या क्वालिटीचे असणे आवश्यक आहे. तुम्ही जर चांगली चव दिली तर तुमच्या दुकानात ग्राहकांची संख्या वाढेल. यामुळे तुमचा सेल वाढेल आणि साहजिकच उत्पन्न देखील चांगले मिळेल. जर तुम्ही एका महिन्यात 2000 बाऊल सुप विकले तरी देखील तुम्ही महिन्याकाठी लाखो रुपयांची कमाई करू शकणार आहात.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा