35000 चे मशीन खरेदी करा अन सुरु करा ‘हा’ भन्नाट व्यवसाय ! महिन्याकाठी कमवा लाखो रुपये, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea Marathi : गेल्या काही वर्षांमध्ये नोकरी ऐवजी व्यवसाय करण्याकडे तरुणांचा कल असल्याचे पाहायला मिळत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे नोकरीमध्ये आता खूपच असुरक्षितता निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात नोकरकपात होत असल्याने आता नोकरी ऐवजी आपला छोटा-मोठा व्यवसाय बरा अशी भावना तरुणाईमध्ये रुजू लागली आहे.

तर काही लोक सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अशा या रुटीन कामाला कंटाळून आता व्यवसायाकडे वळू लागले आहेत. कारण काहीही असो मात्र गेल्या काही वर्षांमध्ये व्यवसाय करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे यात शंकाच नाही. तर काही जाणकार लोक सध्या देशात बेरोजगारीचा दर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने आणि नोकरीच्या संध्या कमी झाल्या असल्याने व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे सांगत आहेत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जर तुम्हीही व्यवसाय करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की आज आपण अशा एका भन्नाट व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत ज्यामध्ये सुरुवातीला फक्त एक लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागणार आहे. आज आपण ज्या व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत त्या व्यवसायासाठी फक्त 35 हजार रुपये किमतीच्या मशीनची गरज भासणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बिजनेस बाबत सविस्तर माहिती.

कोणता आहे तो व्यवसाय? 

आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलत आहोत तो व्यवसाय आहे मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय. अलीकडे कोणतेही फंक्शन असो, छोटे किंवा मोठे प्रत्येक फंक्शनमध्ये मेणबत्ती वापरली जात आहे. छोटा बर्थडे जरी असला तरी देखील रंगीबेरंगी मेणबत्ती वापरली जात आहे. लग्नसराई सारख्या कार्यात देखील मेणबत्तीचा मोठ्या प्रमाणात आता वापर होऊ लागला आहे.

दिवाळी आणि दसऱ्याच्या काळातही मेणबत्तीला बाजारात मागणी असते. एकूणच काय की सजावटीच्या कामासाठी आता रंगीबेरंगी मेणबत्तीचा मोठ्या प्रमाणात वापर वाढलेला आहे. आता छोटे-मोठे उत्सवात देखील सजावट केली जात आहे आणि या सजावटीसाठी मेणबत्ती हा एक मुख्य घटक बनत चालला आहे. त्यामुळे मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय हा निश्चितच फायदेशीर ठरणार आहे यात शंकाच नाही.

घरातूनही सुरू करू शकता हा व्यवसाय

या व्यवसायाची एक विशेष बाब म्हणजे हा व्यवसाय घरातूनही सुरू केला जाऊ शकतो. जर तुम्ही भाड्याने गाळा घेऊन हा व्यवसाय सुरू केला तरी देखील चालू शकते. पण जर तुमच्या घरात थोडीशी जागा असेल तरी देखील हा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो. या व्यवसायासाठी जे मशीन लागते त्या मशीनची साईज देखील कमी असते यामुळे ते छोट्याशा रूममध्ये देखील फिट होते.

म्हणून तुमचा व्यवसाय एका छोट्याशा खोलीमध्ये देखील सुरू होऊ शकतो. या व्यवसायासाठी सुरुवातीला तुम्हाला 35 हजार रुपयांचे मेणबत्ती बनवण्याचे मशीन घ्यावे लागणार आहे. या मशीन चा वापर करून दर तासाला 1800 मेणबत्ती बनवल्या जाऊ शकतात असे सांगितले जात आहेत. मेण, धागा, रंग आणि इथर ऑइल यांसारख कच्चे मटेरियल मात्र यासाठी तुम्हाला लागणार आहे.

एकूणच काय की 35 ते 40 हजारापर्यंतचे मेणबत्ती बनवण्याचे मशीन, कच्च्या मटेरियलसाठी 20 ते 30 हजार रुपये आणि इतर काही खर्च म्हणून आणखी 30 हजारापर्यंतची रक्कम अशी एकूण एक लाख रुपयांची रक्कम खर्च करून तुम्ही हा व्यवसाय मोठ्या थाटात सुरू करू शकणार आहात. बाजारात मेणबत्तीला नेहमीच मागणी राहत असल्याने या व्यवसायातून महिन्याकाठी सहज लाखो रुपयांची कमाई होऊ शकते.