Business Idea In Marathi : अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो मात्र कोणता व्यवसाय सुरू करावा हे सुचत नाही. जर तुम्हीही अशाच पेचात असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. कारण की, आज आपण अशा एका बिजनेस ची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून वर्षाकाठी बारा लाख रुपयांपर्यंतची कमाई करता येणे शक्य होणार आहे. म्हणजेच महिन्याला एक लाख रुपयांचा नफा मिळणार आहे.
कोणता आहे तो व्यवसाय?
आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलत आहोत तो आहे बबल पॅकिंग पेपर बिझनेस. बबल पॅकिंग पेपरला अलीकडे बाजारात मोठी मागणी आली असेल. हे मोल्ड केलेले औद्योगिक पेपर असतात. हे पेपर वेगवेगळ्या वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी वापरले जाते.
अलीकडे ऑनलाईन शॉपिंगला अधिक महत्त्व आले असल्याने या पेपरचा वापर आणखी वाढला आहे. भारतात गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड सेट झाला आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन शॉपिंगचे मार्केट आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत या व्यवसायाला नजीकच्या भविष्यात सुगीचे दिवस येतील अशी आशा आहे. या पेपरचा वापर हा फूड कंजूमेबल वस्तू, अंडी, संत्री, सफरचंद, द्राक्षे आणि लिची यांसारख्या फळांच्या पॅकेजिंग आणि वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
या अष्टपैलू पॅकिंग पेपरचा कोणत्याही उत्पादनासाठी वापर केला जाऊ शकतो. हा पेपर ज्या वस्तूंची निर्यात केली जाते त्या वस्तूंच्या पॅकिंगसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. म्हणजेच बबल पॅकिंग पेपरचा व्यवसाय हा मंदीत जाणारा व्यवसाय नाही. यातून चांगली कमाई होण्याची शक्यता आहे.
किती गुंतवणूक करावी लागणार
या संपूर्ण बिजनेसचा सेटअप करण्यासाठी तुम्हाला 15 लाखांपर्यंतची गुंतवणूक करावी लागणार आहे. या व्यवसायासाठी तुम्हाला आठशे स्क्वेअर फिट जागेवर शेड तयार करावे लागणार आहे. यासाठी जवळपास दीड लाखांच्या आसपास खर्च करावा लागू शकतो.
दुसरीकडे या बिझनेससाठी तुम्हाला काही मशीन्स खरेदी करावे लागतील. यासाठी तुम्हाला पावणे सात लाख रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागू शकतो. याशिवाय तुम्हाला वर्किंग कॅपिटल म्हणून सात लाख रुपयांची रक्कम लागणार आहे.
अशा तऱ्हेने तुमचा हा संपूर्ण बिजनेसचा सेटअप म्हणजेच वर्किंग कॅपिटल सहित 15 लाख रुपयांमध्ये पूर्ण होणार आहे. जर तुमच्याकडे एवढी मोठी अमाउंट नसेल तर तुम्ही या व्यवसायासाठी पीएम मुद्रा योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकता.
म्हणजेच तुम्ही हा व्यवसाय अवघ्या पाच लाख रुपयांमध्ये सुरू करू शकता. तुमच्याकडे जर पाच लाख रुपयांची अमाऊंट असेल तर तेवढी अमाऊंट गुंतवून आणि उर्वरित रक्कम कर्ज स्वरूपात घेऊन तुम्ही या व्यवसायाला सुरुवात करू शकता.
किती कमाई होणार
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधरा लाखाच्या गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू केला तर वर्षाकाठी 60 लाख रुपयांचा टर्नओव्हर करता येणार आहे. यात 12 लाख रुपये एवढा तुमचा नफा राहणार आहे. म्हणजेच या व्यवसायातून महिन्याकाठी एक लाख रुपयांपर्यंतची कमाई करता येणार आहे.