तुमच्याकडे 2 लाख रुपये असतील तर ‘हा’ व्यवसाय सुरु करा, महिन्याकाठी होणार 10 लाखांपर्यंतची कमाई, वाचा कोणता आहे हा व्यवसाय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea In Marathi : अलीकडे तरुणाईचा माईंडसेट चेंज झाला आहे. नवयुवक तरुण, तरुणींचा आता नोकरीमध्ये रस राहिलेला नाही. नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असे स्वप्न लाखों नवयुवक तरुण उराशी बाळगून आहेत. कोणतीही नोकरी असली तरी देखील नोकरीमध्ये काही निर्बंध असतात.

अगदी कंपनीमध्ये मॅनेजर जरी असले तरी देखील त्या पदासाठीही काही निर्बंध ठरवून दिलेले आहेत. यामुळे निर्बंधामध्ये जगण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरु करून स्वतः मालक बनून जगणे अलीकडे तरुणाईला आवडू लागले आहे. मात्र असे असले तरी अनेक तरुणांना कोणता व्यवसाय सुरू करावा याबाबत सुचत नाही. अनेकांकडे भांडवल असते मात्र व्यवसायाची कल्पना नसते.

यामुळे इच्छा असताना देखील व्यवसाय सुरू करताना त्यांना उशीर होतो. अशा परिस्थितीत आज आपण एका भन्नाट व्यवसायाची कल्पना जाणून घेणार आहोत. आज आपण दोन लाख रुपये गुंतवून महिन्याकाठी दहा लाखांपर्यंतची कमाई होणाऱ्या एका फ्रेंचाईजी मॉडेलच्या बिझनेस आयडिया बद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणता आहे तो व्यवसाय

आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो आहे अमूल फ्रॅंचाईजी बिजनेस. मीडिया रिपोर्टनुसार, अमूल फ्रेंचाईजी बिझनेस मध्ये भरपूर मार्जिन असून या व्यवसायातून दरमहिना दहा लाखांपर्यंतची कमाई होऊ शकते. अमूल फ्रेंचाईजीचा हा बिजनेस दोन प्रकारे सुरू करता येतो. यामध्ये दोन लाख रुपये गुंतवणूक करून अमूल आउटलेट उघडले जाऊ शकते आणि पाच लाख रुपये गुंतवणूक करून अमोलची फ्रेंचाईजी घेतली जाऊ शकते.

या व्यवसायासाठी किती जागा लागेल ?

एका मीडिया रिपोर्टनुसार अमूल बिझनेस फ्रॅंचाईजी सुरू करण्यासाठी 150 स्क्वेअर फुट जागा लागते. तसेच जर अमोल ची आईस्क्रीम पार्लर फ्रेंचायजी घ्यायची असेल तर यासाठी 300 स्क्वेअर फुट जागा लागणार आहे.

व्यवसायातून किती नफा मिळणार

फ्रॅंचाईजी बिझनेस हा कमिशन वर चालतो. अमोल फ्रेंचाईजी बिजनेस देखील कमिशनवर चालणार आहे. यामधे दुधाच्या पॅकेटवर 2.5 टक्के, दुधाच्या इतर उत्पादनांवर 10 टक्के आणि आईस्क्रीम विक्रीवर 20 टक्के कमिशन मिळवता येणार अशी माहिती देण्यात आली आहे. शिवाय, रेसिपी-बेस्ड आईस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच आणि हॉट चॉकलेट ड्रिंक्सवर देखील 50 टक्के कमिशन मिळत असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच हा व्यवसाय सुरू करून तुम्ही मोठ्या प्रमाणात कमाई करू शकणार आहात. जेवढा तुमचा सेल वाढेल तेवढी जास्त कमाई या व्यवसायातून होणार आहे.

व्यवसाय सुरू करण्यासाठी कुठे संपर्क साधावा

अमोल फ्रेंजायजीचा हा बिजनेस सुरू करण्यासाठी अमूलच्या amul.com/m/amul-scooping-parlours या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता. तसेच फ्रेंचाईजी बिजनेस बाबत या वेबसाईटवर सविस्तर अशी माहिती अमोलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. निश्चितच अमूल हे देशातील कानाकोपऱ्यात पोहोचलेले एक नामांकित ब्रँड आहे. यामुळे या ब्रँडशी जुडून तुम्ही मोठ्या प्रमाणात कमाई करू शकणार आहात यात शँकाच नाही.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा