Business Idea : अलीकडे नोकरी ऐवजी व्यवसायात तरुणांचे मन रमू लागले आहे. अनेकांचे नोकरीत मन लागत नसल्याने अलीकडे नवीन उद्योग सुरू करणाऱ्यांची संख्या खूपच वाढली आहे. अनेकांनी नवीन व्यवसाय सुरू करून चांगली कमाई देखील केली आहे. मात्र काही लोकांचे नवीन व्यवसाय काही काळातच बंद देखील पडले आहेत.
अनेकदा काही तरुण कोणताही रिसर्च न करता व्यवसायात उतरतात आणि असा व्यवसाय काही काळातच बंद होतो. पण जर योग्य रीसर्च केला आणि मग व्यवसायाची सुरुवात केली तर व्यवसाय निश्चितच यशस्वी होतो. तर काही नवयुवक तरुणांकडे वेगवेगळ्या व्यवसायाच्या कल्पना असतात परंतु पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्याने इच्छा असताना देखील अशा तरुणांना व्यवसाय सुरू करता येत नाही.
तर काही तरुणांकडे खूपच कमी भांडवल असते. अशा तरुणांना कोणता व्यवसाय करावा हे सुचत नाही. जर तुमच्याकडेही कमी भांडवल असेल आणि तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायलाच पाहिजे.
कारण की आज आपण अवघ्या दीड लाखात सुरू होणाऱ्या एका विशेष व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत. आज आपण ज्या व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत तो व्यवसाय कधीच आऊटडेटेड होणार नाही. म्हणजेच या व्यवसायाची मागणी कायम राहणार आहे. विशेष म्हणजे हा व्यवसाय मात्र दीड लाखाच्या भांडवल मध्ये सुरू होणार आहे.
कोणता आहे तो व्यवसाय ?
आज आपण ज्या व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत तो व्यवसाय आहे केळीपासून पेपर बनवण्याचा व्यवसाय. याला बनाना पेपर मेकिंग बिजनेस म्हणून ओळखले जाते. बनाना पेपर मार्केटमध्ये कायमच मागणी मध्ये राहते. बनाना पेपर मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करून तुम्ही देखील लाखो रुपयांची कमाई करू शकता. बनाना पेपर पर्यावरणास पूरक असल्याने आगामी काही वर्षात या व्यवसायाची क्रेझ आणखी वाढणार आहे.
किती रुपयात सुरू होणार हा व्यवसाय
बनाना पेपर हा केळीच्या झाडाची साल किंवा केळीच्या सालीच्या तंतूंपासून बनवलेला कागद असतो. जसं की आपणास ठाऊकच आहे की बाजारात कागदाची मागणी मोठी असते. मात्र बाजारात उपलब्ध होणारा पारंपारिक कागद पर्यावरणासाठी घातक आहे. हा कागद पशूंच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम करतो.
पण पारंपारिक कागदाच्या तुलनेत, केळीच्या कागदात कमी घनता, उच्च सामर्थ्य, उच्च डिस्पोजेबिलिटी, उच्च पुनर्वापरक्षमता आणि उच्च तन्य शक्ती असते. हेच कारण आहे की, या पेपरला बाजारात नेहमीच मागणी राहते. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने तयार केलेल्या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण 16 लाख 47 हजार रुपये खर्च येणार आहे.
पण व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातून जास्त गुंतवणूक करावी लागणार नाही. कारण की, या व्यवसायासाठी कर्जदेखील उपलब्ध होणार आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या खिशातून फक्त 1 लाख 65 हजार रुपये खर्च करावे लागतील. म्हणजे जवळपास दीड लाखाच्या आसपासची रक्कम तुम्हाला गुंतवावी लागणार आहे. आणि उर्वरित रक्कम ही कर्ज स्वरूपात उपलब्ध होणार आहे.
म्हणजे या व्यवसायासाठी आवश्यक असलेली 11 लाख 93 हजार रुपयांची रक्कम मुदत कर्ज स्वरूपात मिळणार आहे. तसेच खेळत्या भांडवलासाठी 2 लाख 9 हजार रुपये कर्ज उपलब्ध होऊ शकते असे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त या व्यवसायासाठी पीएम मुद्रा योजनेअंतर्गत देखील दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणार हा परवाना
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मात्र काही परवाने घ्यावे लागणार आहेत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, जीएसटी नोंदणी, एमएसएमई उद्योग ऑनलाइन नोंदणी, बीआयएस प्रमाणपत्र, प्रदूषण विभागाकडून एनओसी देखील घ्यावी लागणार आहे.
किती नफा मिळणार बरं
सदर प्रोजेक्ट रिपोर्ट नुसार या व्यवसायात वार्षिक 5 लाख रुपयांहून अधिकची कमाई होऊ शकते. या व्यवसायातून नव्याने व्यवसायात उतरणाऱ्या उद्योजकांना पहिल्या वर्षी सुमारे 5.03 लाख रुपयांचा नफा होऊ शकतो. दुसऱ्या वर्षी ६.०१ लाख आणि तिसऱ्या वर्षी ६.८६ लाख रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकणार आहे.
यानंतर हा नफा झपाट्याने वाढणार असून पाचव्या वर्षी सुमारे 8 लाख 73 हजार रुपयांचा नफा होऊ शकतो असा अंदाज आहे. निश्चितच हा कमी भांडवलात सुरू होणारा व्यवसाय नवउद्योजकांसाठी फायद्याचा राहणार आहे.