Business Idea : तुम्हीही व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहात का, मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. खरे तर अनेकांना स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा असतो. मात्र कोणता व्यवसाय सुरू करावा, कमी गुंतवणुकीत कोणता व्यवसाय सुरू होऊ शकतो याविषयी त्यांना आयडिया नसते. यामुळे आज आम्ही अशाच नवयुवक तरुणांसाठी एक भन्नाट बिजनेस आयडिया घेऊन आलो आहोत.
आज आपण मोबाईल टेम्पर्ड ग्लास मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता भारतात मोबाईल फोनचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. स्मार्टफोन हा आता आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे. दरम्यान आपण जेव्हाही नवीन मोबाईल खरेदी करतो तेव्हा त्याला टेम्पर्ड ग्लास बसवत असतो.
यावरून आपल्याला टेम्पर्ड ग्लासची बाजारात किती मागणी आहे हे समजते. यामुळे जर तुम्हालाही एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही टेम्पर्ड ग्लास मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस सुरू करू शकता. आता आपण टेम्पर्ड ग्लास मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस बाबत सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा सुरू करणार बिजनेस
टेम्पर्ड ग्लास बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एक मशीन खरेदी करावी लागणार आहे. तसेच यासाठी कच्चा माल लागतो. यासाठी तुम्हाला अँटी सॉक स्क्रीन प्रोटेक्टर फिल्म आणि ऑटोमॅटिक टेम्पर्ड ग्लास मेकिंग मशीन खरेदी करावी लागेल.
यामध्ये एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले असते जें की ॲप्लिकेशनद्वारे चालते. याशिवाय तुम्हाला या बिझनेससाठी ग्लास पॅकिंग करण्यासाठी मटेरियल देखील लागणार आहे. टेम्पर्ड ग्लास पॅक करण्यासाठी आणि विकण्यासाठी, आपल्याला पॅकिंग सामग्री खरेदी करावी लागते.
कसा बनवणार टेम्पर्ड ग्लास
मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पर्ड ग्लास मेकिंग मशीनच्या मदतीने टेम्पर्ड ग्लास बनवणे खूपच सोपे आहे. त्यात सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले असते. तसेच याचे नियंत्रण हे अनुप्रयोगाद्वारे म्हणजेच एप्लीकेशनद्वारे केले जाते. या मशिनच्या साहाय्याने टेम्पर्ड ग्लास बनवण्यासाठी तुम्हाला प्रथम या मशीनमध्ये टेम्पर्ड ग्लास शीट बसवावी लागेल. तुम्हाला मशिन चालू करून ते तुमच्या मोबाईल आणि लॅपटॉपला जोडावे लागेल.
तुम्हाला या मशीनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला ज्यां मॉडेलचे टेम्पर्ड ग्लास बनवायचे आहे त्या प्रकारची रचना तयार करावी लागते. ही रचना तुम्हाला एप्लीकेशन मध्ये तयार करावी लागणार आहे. म्हणजेच हा ग्लास पूर्णपणे ऑटोमॅटिक पद्धतीने तयार होतो. स्वयंचलित पद्धतीने टेम्पर्ड ग्लास तयार झाल्यानंतर तुम्हाला तो बाहेर काढावा लागेल आणि नंतर ते पॅक करून विक्रीसाठी पाठवावे लागणार आहे.
व्यवसायासाठी किती खर्च करावा लागणार
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. व्यवसायाचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या बिझनेससाठी लायसन्स देखील घ्यावे लागणार आहे. हे काम पूर्ण झाले की मग तुम्ही हा व्यवसाय सहजतेने सुरू करू शकता.
या व्यवसायासाठी तुम्हाला मशीनसाठी एक लाख रुपये आणि इतर खर्च म्हणून 50 हजार रुपये असे एकूण दीड लाख रुपये खर्च करावे लागतील. घरून व्यवसाय सुरू करत असाल तर दीड लाख रुपये आणि जर तुम्ही दुसरीकडे जागा घेऊन हा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर तुम्हाला यापेक्षा अधिकची गुंतवणूक करावी लागू शकते
किती कमाई होणार ?
एक टेम्पर्ड ग्लास बनवण्यासाठी दहा ते पंधरा रुपयांचा खर्च करावा लागतो. बाजारात एका टेम्पर्ड ग्लासची विक्री जवळपास 100 ते 200 रुपयांपर्यंत केले जाते. म्हणजेच तुम्ही जर मिनिमम रेटमध्ये जरी याची विक्री केली तरी देखील तुम्हाला 80 रुपये प्रती टेम्पर्ड ग्लास एवढा मार्जिन मिळणार आहे. यातून तुम्हाला या व्यवसायातून किती कमाई होऊ शकते याचा एक अंदाज सहजतेने बांधता येणार आहे.