Business Idea : भारतात अलीकडे नवनवीन स्टार्टअप सुरू झाले आहेत. नोकरी ऐवजी आता व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे. देशातील नवयुवक तरुण वर्ग आता वेगवेगळे व्यवसाय सुरू करत आहेत. अनेकांना मात्र इच्छा असतानाही व्यवसाय सुरू करता येत नाहीये.
कमी गुंतवणुकीत कोणता व्यवसाय सुरू करावा हेच अनेकांना सुचत नाही. दरम्यान आज आपण लो इन्वेस्टमेंट मध्ये सुरू केल्या जाणाऱ्या एका भन्नाट बिजनेस प्लॅन बाबत चर्चा करणार आहोत.
आज आपण ब्युटी पार्लर बिजनेस आयडिया संदर्भात माहिती पाहणार आहोत. खरंतर अलीकडे ब्युटी पार्लरला मोठी मागणी आली आहे. सलून किंवा ब्युटी पार्लरमध्ये लोकांच्या केसांची आणि त्वचेची काळजी घेतली जाते.
आजकाल तरुणांमध्ये एक्सक्लुझिव्ह ब्युटी आणि वेलनेस पार्लरची क्रेझ आहे. विशेष म्हणजे ही क्रेज वेगाने वाढतचं आहे. खेड्यापाड्यापासून शहरांपर्यंत ब्युटी पार्लरमध्ये लांबच लांब रांग पाहायला मिळते.
लग्न असो किंवा इतर कोणताही उत्सव असो, प्रत्येक प्रसंगी महिला ब्युटी पार्लरमध्ये जातात. अशा परिस्थितीत हा व्यवसाय सुरू केल्यास चांगली कमाई होऊ शकणार आहे.
मात्र यासाठी तुम्हाला अशा ठिकाणी ब्युटी पार्लर ओपन करावे लागेल जिथे नेहमीच ग्राहकांची वर्दळ राहते. लोकेशन चांगल असेल तर तुमचा बिजनेस चांगला ग्रोथ करणार आहे.
ब्युटी पार्लर व्यवसायासाठी किती गुंतवणूक करावी लागणार
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जवळपास तीन लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते. यातील दोन लाख रुपये हे मशीनरी, फर्निचर, इक्विपमेंट, चेअर, मिरर इत्यादींवर खर्च करावे लागणार आहेत.
जर तुमच्याकडे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. सरकारच्या पीएम मुद्रा योजनेअंतर्गत या व्यवसायासाठी कर्ज मिळू शकते.
किती कमाई होणार ?
जर तुमचा व्यवसाय पॉश ठिकाणी असेल तर या व्यवसायातून लाखो रुपये कमावले जाऊ शकतात. तुमच्या दुकानावर मोठ्या संख्येने ग्राहक येऊ लागलेत तर तुम्हाला या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळणार आहे.
ग्राहक संख्या वाढल्यास तुम्ही तुमच्या दुकानात दिल्या जाणाऱ्या सेवा देखील वाढवू शकता. तसेच दुकानात कामासाठी काही कुशल कारागिरांची देखील तुम्ही नेमणूक करू शकता.
साधारणता ब्युटी पार्लर व्यवसायातून महिन्याकाठी एक लाख रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते. मात्र ही कमाई तुमच्या धंद्यावर अवलंबून राहणार आहे. चांगला धंदा झाला तर चांगले उत्पन्न तुम्हाला मिळणार आहे.