जपानी तंत्रज्ञानाची पहिली बुलेट ट्रेन महाराष्ट्रातून धावणार ! ‘ही’ दोन शहरे जोडणार, किती काम झालंय ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bullet Train Maharashtra : अमेरिकेने जपान मधील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अनुबॉम्ब टाकला होता. यामुळे जपानचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी अमेरिकेच्या या कठोर निर्णयामुळे जपानमध्ये मोठी जीवित हानी पाहायला मिळाली.

या संकटांमधून सावरत जपानने अवघ्या काही दशकात अशी अभूतपूर्व प्रगती साधली आहे की संपूर्ण जगाला जपानचा हेवा वाटत आहे. जपानने माहिती आणि तंत्रज्ञानात खूपच प्रगती केली आहे. सोबतच या देशाने इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये देखील मोठी प्रगती साधली आहे. जपानमध्ये बुलेट ट्रेन सारखी हायस्पीड ट्रेन सुरु आहे.

दरम्यान आपल्या भारतातही जपान प्रमाणेच बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे. आपल्या देशात सुरुवातीच्या टप्प्यात सात महत्त्वाच्या मार्गावर बुलेट ट्रेन सुरु केली जाणार आहे. यात मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा देखील समावेश होतो. सध्या या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.

महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना परस्परांना जोडणारा हा प्रकल्प दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेनची भेट भारताच्या आर्थिक राजधानीला मिळणार असल्याने हा प्रकल्प मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अति महत्त्वाचा ठरत आहे.

दरम्यान या बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत नुकतीच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून नुकताच या प्रकल्पाचा 100 किलोमीटर लांबीचा पूल पूर्ण झाला असून 250 किलोमीटरसाठी खांब उभारण्यात आले आहेत.

खरे तर या प्रकल्पाचे उद्घाटन 2017 मध्ये तत्कालीन जपानचे पंतप्रधान सिंजो आबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. तेव्हापासून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

हा प्रकल्प नॅशनल हाय स्पीड कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थातच एन एच एस आर सी एल च्या माध्यमातून पूर्ण केला जात आहे. दरम्यान या प्रकल्पाबाबत नॅशनल हाय स्पीड कॉर्पोरेशन लिमिटेड ने महत्वाची माहिती दिली आहे.

प्राधिकरणाने सांगितल्याप्रमाणे बुलेट ट्रेन प्रकल्प अंतर्गत 40 मीटर लांबीचे फुल स्पॅन बॉक्स गर्डर व सेगमेंट जोडून 100 किलोमीटरचा मार्ग आतापर्यंत बांधण्यात आला आहे. एवढेच नाही तर या प्रकल्पांतर्गत गुजरात मधील वलसाड जिल्ह्यात विकसित होत असलेला प्रकल्पाचा पहिला बोगदा नुकताच पूर्ण झाला आहे.

तसेच सुरत मध्ये ७० मीटर लांबीचा पहिला पोलादी फुलही बांधण्यात आला आहे. एकंदरीत या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. म्हणून या प्रकल्पाचा पहिला टप्पा नियोजित वेळेत अर्थातच 2026 मध्ये पूर्ण होणार असा आशावाद व्यक्त होत आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान या प्रकल्पांतर्गत 508 किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेन मार्ग विकसित होत आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 350 किलोमीटर प्रति तास वेगाने या मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास फक्त तीन तासात पूर्ण होईल असा दावा केला जात आहे. सध्या स्थितीला मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रवाशांना साडेपाच तासांचा वेळ लागत आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा