Bullet Train 2023 : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न झाले आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून देशात आता बुलेट ट्रेन सुरू केली जाणार आहे. देशातील एकूण सात महत्त्वाच्या मार्गांवर बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे.
विशेष म्हणजे या सात पैकी पहिली बुलेट ट्रेन आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे. म्हणजेच देशातील पहिली बुलेट ट्रेन आपल्या महाराष्ट्रातून धावणार आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि गुजरात मधील अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे.
सध्या या पहिल्या बुलेट ट्रेनचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून हा बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण केला जात आहे. खरंतर बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास वेगवान होणार आहे.
बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर अहमदाबाद येथील नागरिकांना मुंबईकडे येणे सोपे होणार आहे. यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्याचा एकात्मिक विकास साधता येणार आहे. सध्या या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पीयर्स आणि टनेल चे काम सुरू आहे.
नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन रेल्वे कॉर्पोरेशनने सांगितल्याप्रमाणे, सध्या ज्या गतीने या प्रकल्पाचे काम सुरू आहे त्याचे गतीने पुढे देखील काम सुरू राहिले तर हा प्रकल्प लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकतो. खरंतर महाराष्ट्रासाठी अति महत्त्वाचा असा हा बुलेट ट्रेन प्रोजेक्ट प्रकल्प दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे.
यामुळे पंतप्रधान कार्यालयाचे या प्रकल्पाकडे मोठे बारीक लक्ष आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. स्वतः पंतप्रधानांचे या प्रकल्पाकडे लक्ष आहे. हेच कारण आहे की हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून सर्वसामान्यांसाठी या प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
दरम्यान हा प्रकल्प केव्हा सुरू होणार हा प्रश्न सर्वसामान्यांकडून गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केला जात होता. अशातच आता नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने हा प्रकल्प वर्ष 2026 मध्ये पूर्ण होईल आणि त्यानंतर यावर वाहतूक सुरू होईल असा दावा केला आहे.
कसा आहे प्रकल्प
या प्रकल्पांतर्गत 508 किमी लांबीचा बुलेट ट्रेनचा मार्ग तयार केला जाणार आहे. हा मार्ग मुंबई आणि अहमदाबादला परस्परांना जोडणार आहे. या अंतर्गत विकसित होणाऱ्या एकूण मार्गपैकी 156 किमी लांबीचा मार्ग किंवा कॉरिडोर हा महाराष्ट्रात राहणार आहे आणि 352 किमीचा लांबीचा मार्ग हा गुजरातमध्ये तयार केला जाणार आहे.
यासाठी जवळपास एक लाख आठ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट 2026 पर्यंत या मार्गाचा सुरत ते बिल्लीमोरा हा टप्पा सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकतो. या टप्प्याची 63 किलोमीटर एवढी लांबी राहणार आहे. या मार्गावर 320 किलोमीटर प्रति तास या वेगाने बुलेट ट्रेन धावणार असून यामुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर फक्त 127 मिनिटांमध्ये पार होणार आहे.