वांग्याच्या ‘या’ 4 जातींची लागवड शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ! मिळणार विक्रमी उत्पादन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Brinjal Farming : महाराष्ट्रसह देशातील विविध राज्यांमध्ये वांग्याची लागवड केली जाते. वांगी हे एक प्रमुख भाजीपाला वर्गीय पीक आहे. महाराष्ट्रातील हवामान या पिकासाठी विशेष अनुकूल आहे. यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वांग्याची लागवड केली जाते.

फक्त पारंपारिक पिकांच्या शेतीवर अवलंबून न राहता आता शेतकऱ्यांनी भाजीपाला वर्गीय पिकांसारख्या हंगामी पिकांची देखील मोठ्या प्रमाणात लागवड सुरू केली आहे. यामध्ये वांग्याची देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाऊ लागली आहे. शेतकऱ्यांना या पिकातून चांगले उत्पादन आणि उत्पन्न देखील मिळत आहे.

तथापि या पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी इतर अन्य पिकांप्रमाणे याच्या सुधारित वाणांची लागवड करण्याचा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे. अशा परिस्थितीत आज आपण वांग्याच्या काही प्रमुख सुधारित वाणांची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

वांग्याची लागवड केव्हा केली जाते?

कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, वांग्याची लागवड बारा महिने केली जाऊ शकते. पण आपल्या राज्यातील बहुतांशी शेतकरी या पिकाची खरीप आणि उन्हाळी अशा दोन हंगामातच याची लागवड करतात.

खरीप हंगामामध्ये साधारणता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात याची लागवड होते आणि उन्हाळी हंगामात साधारणता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात वांग्याची लागवड केली जात असते. वांग्याची लागवड करण्यापूर्वी मात्र रोपवाटिकेत याची रोपे तयार करावी लागतात.

रोपवाटिकेत रोपे तयार करण्यासाठी 40 ते 45 दिवसांचा कालावधी लागतो. जर रोपवाटिकेत रोपांची निर्मिती करणे तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळील नर्सरी मधून देखील वांग्याची रोपे मागवू शकता. तथापि विश्वासू नर्सरी मधूनच रोपांची खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.

वांग्याच्या सुधारित जाती खालील प्रमाणे

मांजरी गोटा : राज्यातील हवामान या जातीला मानवते. या जातीपासून सरासरी 250 ते 300 क्विंटल प्रति हेक्टर एवढे दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे. या जातीची वांगी चार ते पाच दिवस टिकतात. त्यामुळे लांबच्या बाजारपेठात विक्रीसाठी हा वाण फायदेशीर ठरत असतो.

कृष्णा : महाराष्ट्रातील हवामान यादेखील जातीला विशेष पुरक आहे. या जातीपासून साधारणता 400 ते 450 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे दर्जेदार उत्पादन मिळते. वांग्याचा हा एक संकरित प्रकार आहे.

फुले हरित : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला हा जात खरीप हंगामासाठी चांगला असतो. या जातीपासून सरासरी 240 ते 480 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. राज्यातील हवामान या जातीला विशेष अनुकूल असून ही जात भरीत करण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे. ज्या भागात भरीत वांग्याची मोठी मागणी असते अशा ठिकाणी या वाणाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा या ठिकाणी मिळू शकणार आहे.

फुले अर्जुन : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली ही एक संकरित जात आहे. या वाणाची एक विशेषता म्हणजे खरीप तसेच उन्हाळी दोन्ही हंगामासाठी या जातीची लागवड केली जाऊ शकते. उत्पादनाचा विचार केला तर इतर सर्व सरळ जातींच्या तुलनेत हा वाण उत्पादनाच्या बाबतीत थोडासा सरस आहे. मिळालेल्या माहितीनुसार या जातीपासून 450 क्विंटल प्रति हेक्‍टरी पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. हा वाण आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जात आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा