Cow Farming : आपल्या देशात शेती आणि पशुपालन हे व्यवसाय फार पूर्वीपासून केले जात आहेत. पशुपालन व्यवसायात गाईंचे आणि म्हशीचे संगोपन मोठ्या प्रमाणात होते. शेतीशी निगडित व्यवसाय असल्याने या व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. पशुपालन विशेषता म्हैस पालन आणि गाय पालन दुग्धोत्पादनासाठी केले जाते.
दुधासोबतच या व्यवसायातून शेणखत देखील मिळते. यामुळे शेतकऱ्यांना शेण खतासाठी अधिकचा पैसा खर्च करावा लागत नाही. शिवाय शेणापासून गोबर गॅस तयार करता येतो. यामुळे गाय पालन हा व्यवसाय दुहेरी आणि तिहेरी उद्देशासाठी केला जात आहे. मात्र असे असले तरी गाय पालन व्यवसायातून जर चांगले दुग्धउत्पादन मिळवायचे असेल तर गाईच्या चांगल्या जातींचे संगोपन करणे आवश्यक आहे.
यामुळे आज आपण गाईच्या एका सुधारीत जातीची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण गाईच्या अशा एका जाती विषयी जाणून घेणार आहोत जी एका वेतात तब्बल 800 ते 900 लिटर दूध देण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील हवामान या गाईच्या जातीला विशेष मानवते. आम्ही ज्या गाईच्या जाती विषयी बोलत आहोत ती आहे डांगी गाय.
काय आहेत या गाईच्या विशेषता
डांगी गाय ही गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा या राज्यात आढळते. येथील शेतकरी गाईच्या या जातीचे मोठ्या प्रमाणात संगोपन करतात. मात्र ही गाय वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. ही गाय अतिशय शांत स्वभावाची मानली जाते आणि ती खूप शक्तिशाली देखील आहे. यामुळे या जातीपासून अधिकचे दूध उत्पादन मिळते. ही जात मुसळधार पावसाच्या प्रदेशात आणि डोंगराळ प्रदेशात देखील पाळली जाऊ शकते.
यामुळे जर तुम्हीही गाय पालन करू इच्छित असाल तर या जातीचे संगोपन करून तुम्ही चांगले दूध उत्पादन मिळवू शकणार आहात. डांगी जातीच्या गायींची उंची सरासरी 113 सेमी, तर बैलांची उंची 117 सेमी पर्यंत असते. या गाईचे वजन 220 ते 250 किलो असते. डांगी गाईचा रंग पांढरा असतो.
गाईच्या शरीरावर असमान लाल किंवा काळे ठिपके असतात. या गाईची शिंगे लहान असतात. कपाळ किंचित पसरट असते. या गाईचे शरीर चमकदार असते आणि त्वचा नरम, मुलायम असते. या जातीच्या गायीच्या स्तनाचा रंग काळा असतो. ही गाय एका वेतात 800 लिटर पर्यंत दूध देण्याची क्षमता ठेवते.