नमस्कार शेतकरी बांधवांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना सरसकट कांदा अनुदान मिळणार आहे, त्या संबंधित आजच मुख्यमंत्र्यांद्वारे निर्णय घेण्यात आलेला आहे.
आजच्या पोस्ट मध्ये आपण याविषयीच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे ही महत्त्वाची अशी माहिती काळजीपूर्वक वाचा.
शेतकरी मित्रांनो गेल्या काही महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचे कांद्याला योग्य भाव न मिळाल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानाची भरपाई करण्यासाठी, शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलून कांदा अनुदान देण्यासंबंधी मान्यता दिली आहे. परंतु त्यासाठी सुरुवातीला अनेक अटी देखील शासनाद्वारे सांगण्यात आल्या, या अटीचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच कांदा अनुदान मिळणार असे पण शासनाने सांगितले.
शासनाने जाहीर केलेल्या अटींमध्ये काही जाचक स्वरूपाच्या अटी होत्या, ज्या अटींमुळे राज्यातील बहुतांश शेतकरी कांदा अनुदान लाभांपासून वंचित राहणार होता. त्या अटीला आज रद्द करण्यात आला आहे, आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कांदा अनुदान देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
त्यासंदर्भात अधिक ची माहिती देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांची सातबारा वर पिक पेऱ्याची नोंदणी नाही, अशा शेतकऱ्यांची देखील पंचनामे नोंदणी करावी असा आदेश देण्यात आला आहे. याचाच अर्थ आता कांदा अनुदानासाठी पीक पेऱ्याची जी अट लावण्यात आली होती, ती आता रद्द करण्यात येणार आहे.
यामुळे खरंच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, शासनाद्वारे घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा होता का याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा. धन्यवाद!