गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशात घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, पुणे सारख्या महानगरांमध्ये तर किमतीचा आलेख हा सर्वाधिक वाढलेला दिसतोय. त्यामुळे या अशा महानगरांमध्ये घर खरेदीचे स्वप्न उराशी बाळगणारे बहुतांशी लोक म्हाडा आणि सिडकोच्या घरांची वाट पाहत असतात.
म्हाडा आणि सिडको प्राधिकरण नागरिकांना परवडणाऱ्या दरात सदनिका उपलब्ध करून देत आहे. यामुळे जेव्हा-केव्हा म्हाडा किंवा मग सिडको कडून घरांसाठी लॉटरी जाहीर केली जात असते तेव्हा या घरांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतो. विशेषता मुंबईमधील घरांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आणि लाखोंच्या संख्येने नागरिक या घरांसाठी अर्ज करतात.
दरम्यान सिडकोने जानेवारी महिन्यात एक लॉटरी जाहीर केली होती. प्रजासत्ताक दिनाचे मुहूर्तावर 3322 घरांसाठीच्या लॉटरीची जाहिरात काढण्यात आली. यामध्ये तळोजा आणि द्रोणागिरी येथील घरांचा समावेश होता. खर तर जानेवारी महिन्यात याची लॉटरी निघाली आणि १६ एप्रिल पर्यंत यासाठी अर्ज करण्यासं मुदतवाढ देण्यात आली.
विशेष म्हणजे या सरांसाठी 19 एप्रिल 2024 ला लॉटरी निघणार होती. मात्र, त्यावेळी नेमकी लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसहिता सुरू होती. यानंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या घरांसाठी महूर्त लागला. सात जुलै 2024 ला या घरांसाठी लॉटरी निघणार असे सिडको ने सांगितले होते. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे हा देखील मुहूर्त हुकला आणि या घरांसाठी अर्ज केलेल्या नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले.
आता मात्र या लॉटरीसाठी मुहूर्त ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घरांसाठी 16 जुलैला लॉटरी निघणार आहे. 16 जुलैला सकाळी अकरा वाजता ही लॉटरी काढली जाणार आहे. लॉटरी निघाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी विजयी अर्जदारांचे नावे सार्वजनिक केली जाणार आहेत.
जे लोक या लॉटरीमध्ये विजयी होतील त्यांना घराचा ताबा दिला जाणार आहे आणि जे लोक अयशस्वी होतील त्यांना 29 जुलै पर्यंत परतावा मिळणार आहे. निश्चितचं, गेल्या अनेक दिवसापासून ज्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्या घरांसाठी आता येत्या 6 दिवसांनी लॉटरी निघणार असल्याने हजारो नागरिकांचे घर खरेदीचे स्वन पूर्ण होणार आहे.