Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारने स्थापित केलेली एक मध्यवर्ती बँक आणि बँकिंग नियामक संस्था आहे. ही संस्था देशातील सर्व बँकांवर लक्ष ठेवून असते. या संस्थेची स्थापना 1935 मध्ये झाली आहे.
तेव्हापासून आरबीआय देशातील सर्व बँकांसाठी एक सर्वोच्च संस्था म्हणून ओळखली जात आहे. RBI देशातील बँकांसाठी विविध नियम बनवते. या नियमांचे पालन करणे बँकांना बंधनकारक असते. जर बँका या नियमांचे पालन करत नसतील तर बँकांवर आरबीआयच्या माध्यमातून कठोर कारवाई केली जात असते.
बँकांनी नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते कित्येकदा तर बँकेचे लायसन्स अर्थात परवाना देखील रद्द केला जातो. दरम्यान रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक, मर्सिडिज बेंझ फायनान्शिअल सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि कोसामट्टम फायनान्स लिमिडेट या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
या कारवाईमुळे संबंधित बँकेतील बँक ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. ग्राहकांमध्ये आरबीआयच्या या निर्णयामुळे भीतीचे वातावरण आहे. पण RBI ने केलेल्या या दंडात्मक कारवाईमुळे संबंधित बँकेतील बँक खातेधारकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही यामुळे खातेधारकांनी निश्चिंत रहावे असे जाणकार लोकांनी सांगितल आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शुक्रवारी अर्थातच काल तीन नोव्हेंबर 2023 रोजी आरबीआय ने या कारवाईबाबतची माहिती दिली आहे. आरबीआय ने सांगितल्याप्रमाणे, पीएनबीला ७२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
या बँकेने केवायसी निर्देश 2016 च्या तरतुदींचे पालन केले नसल्याने हा दंड आकारण्यात आला आहे. तसेच फेडरल बँकेवर ३० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेनं मर्सिडीज बेंझ फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडवर देखील आपल्या केवायसी निर्देश, २०१६ च्या काही तरतुदींचं पालन न केल्याबद्दल १० लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे वृत्त समोर आले आहे. कोसामट्टम फायनान्स लिमिटेड या बँकेवर 13.38 लाख रुपये एवढा दंड ठोठावण्यात आला आहे.