Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी महाराष्ट्रासाठी विशेष खास राहणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, आपल्या महाराष्ट्राला लवकरच एक नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट दिली जाणार आहे.
सध्या राज्यातुन आठ वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. राज्यातील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते गोवा, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गावर ही गाडी सुरू आहे. भविष्यात मात्र कोल्हापूरला देखील वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
जानेवारी 2024 मध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असा दावा केला होता. दानवे यांनी त्यावेळी येत्या दोन महिन्यात कोल्हापूरला वंदे भारत ट्रेन मिळणार असे म्हटले होते. मात्र, आता मे महिना उलटत चालला आहे तरीही कोल्हापूरला वंदे भारत ट्रेनची भेट मिळालेली नाही.
त्यामुळे शहरातील नागरिकांच्या माध्यमातून या हाय स्पीड ट्रेन संदर्भात संभ्रमअवस्था पाहायला मिळत आहे. तथापि, नुकत्याच काही दिवसांपूर्वी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एका प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरला लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे म्हटले आहे.
यामुळे पुन्हा एकदा या वंदे भारत एक्सप्रेसच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मीडिया रिपोर्ट नुसार, लोकसभा निवडणुका संपल्यानंतर जे नवीन सरकार केंद्रात सत्ता स्थापित करेल ते नवीन सरकार मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करू शकते. असे झाल्यास मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास निश्चितच मोठा गतिमान होणार आहे. या हाय स्पीड ट्रेनमुळे भविष्यात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबईहुन दररोज हजारोंच्या संख्येने भावीक कोल्हापूरला जात असतात. यामुळे जर ही गाडी सुरू झाली तर या भाविकांचा प्रवास हा गतिमान होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या वाढणार आहे.
या गाडीचा सातारा आणि सांगली जिल्ह्यातील प्रवाशांना देखील फायदा होणार आहे. यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर समवेतच पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून ही वंदे भारत ट्रेन लवकरात लवकर सुरू केली गेली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे.