Bharat Rice Price : येत्या काही दिवसात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुका झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यामुळे सध्या सर्वत्र राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे.
याशिवाय सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न देखील केले जात आहेत. केंद्र शासनाकडून सर्वसामान्यांना वाढत्या महागाईतून दिलासा मिळावा यासाठी भारत ब्रँड अंतर्गत स्वस्तात पीठ, चणाडाळ उपलब्ध करून दिली जात आहे.
खरे तर येत्या निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकारला विपक्षकडून महागाईच्या मुद्द्यावरून धारेवर धरले जाणार असे बोलले जात आहे. जाणकार लोक महागाईचा मुद्दा केंद्रातील सरकारला महागात पडू शकतो असे सांगत आहेत.
दरम्यान याच साऱ्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने देखील मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी आजपासून शासनाने सर्वसामान्यांना स्वस्तात तांदूळ उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
आज केंद्राने भारत ब्रँड अंतर्गत तांदूळ विक्रीला सुरुवात केली आहे. यामुळे सर्वसामान्यांना आता स्वस्तात तांदूळ मिळणार आहे. खरे तर या भारत राईसची गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये मोठी चर्चा आहे.
आजपासून मात्र हा तांदूळ सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे आता आपण या भारत ब्रँड अंतर्गत सर्वसामान्यांना उपलब्ध होणाऱ्या तांदळाची किंमत किती राहणार आणि याची पॅकिंग नेमकी कशी राहणार याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
भारत राईसची किंमत ?
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, स्वस्त भारत तांदळाची विक्री सुरू करण्यात आली आहे. आज 6 फेब्रुवारी 2024 पासून याची विक्री सुरू झाली आहे. हा तांदूळ 5Kg आणि 10Kg पॅकिंगमध्ये उपलब्ध होणार आहे.
याच्या किमती बाबत बोलायचं झालं तर भारत ब्रँड अंतर्गत उपलब्ध होणारा तांदूळ 29 रुपये प्रति किलो या भावात मिळणार आहे. खरंतर बाजारात साधा तांदूळ हा 40 ते 45 रुपये प्रति किलोच्या दरात उपलब्ध होतो.
मात्र हा भारत ब्रँडचा तांदूळ फक्त 29 रुपये प्रति किलो या दरात उपलब्ध होणार असल्याने सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट आटोक्यात राहील अशी आशा व्यक्त होत आहे.
हा स्वस्त तांदूळ केंद्रीय भंडार, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाच्या भौतिक आणि मोबाईल आउटलेटवर उपलब्ध राहणार अशी माहिती देण्यात आली आहे.