Best Tourist Destination For Winter : महाराष्ट्रासहित देशातील काही राज्यांमध्ये आता थंडीची चाहूल लागली आहे. सकाळच्या तापमानात आता मोठ्या प्रमाणात घट आली असून यामुळे देशातील काही भागात थंडीचे वातावरण तयार होत आहे. काही भागात मात्र अजूनही उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत आहे.
आपल्या राज्यातही काही जिल्ह्यांमध्ये अजूनही उष्णतेची लाट पाहायला मिळत असून उकाड्याने हैराण झालेली जनता आता हिवाळ्याला केव्हा सुरुवात होणार हा प्रश्न उपस्थित करत आहे. मात्र, महाराष्ट्रात लवकरच सर्वदुर थंडी पडण्यास सुरुवात होणार आहे. यंदाच्या हिवाळ्यात मात्र नेहमीपेक्षा कमी थंडी राहणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. खरंतर हिवाळा हा ऋतू फिरण्यासाठी खूपच अनुकूल आहे.
अनेक लोक हिवाळ्यामध्ये मोठ-मोठ्या सहलीचे आयोजन करत असतात. काहीजण आपल्या परिवारासमवेत हिवाळ्यामध्ये सुट्टीचा आनंद लुटतात. जर तुम्हीही हिवाळ्यात सहल काढण्याचा प्लॅन बनवत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. कारण की, आज आपण हिवाळ्यात फिरता येतील अशा काही लोकप्रिय ठिकाणांबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
हिवाळ्यात फिरण्यासारखी पर्यटन स्थळे कोणती ?
शिमला : हे देशातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक भेटी देत असतात. जर तुम्हीही हिवाळ्यात कुठे फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर शिमला हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. या पर्यटन स्थळाला कोणत्याही ऋतूत भेट दिली जाऊ शकते पण जर तुम्ही हिवाळ्यात शिमला फिरायला गेलात तर याची बातच काही और राहणार आहे. शिमला हे हिवाळ्यात फिरण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण ठरते. शिमल्याला हिवाळ्याच्या ऋतूत जर भेट दिली तर बर्फवृष्टीचा आनंद घेता येतो. हिवाळ्यात येथे खूपच गार वातावरण राहते. यामुळे जर तुम्ही हिवाळ्यात कुठे जाण्याचा प्लान आखत असाल तर शिमला हे ठिकाण तुमच्या ट्रिपमध्ये नक्कीच ऍड करा.
गोवा : दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्यापूर्वी जर तुमचा फिरण्याचा प्लॅन असेल तर गोवा हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट राहील. गोव्याला बाराही महिने जाता येते मात्र हिवाळ्यात गेलात तर तुमची ट्रीप अधिक रंगतदार बनेल. विशेषता दिवाळीनंतरच्या थंडीत गोवा फिरण्याची मजा काही औरच असते. हिवाळ्यात गोव्यातील समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद हा शब्दात व्यक्त करता येणार नाही. यामुळे जर तुम्ही तुमच्या परिवारासमवेत किंवा मित्रांसमवेत कुठे ट्रिप काढणार असाल तर गोवा हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन राहील.
अंदमान : जर तुम्ही तुमच्या परिवारासमवेत किंवा मित्रांसमवेत क्वालिटी टाईम स्पेंड करण्याच्या मूडमध्ये असाल तर अंदमान हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरेल. हिवाळ्यात अंदमान एक्सप्लोर करण्याची बातच काही और आहे. अंदमानच्या समुद्रकिनाऱ्यावर भेट देऊन तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करू शकणार आहात.
राजस्थान : हिवाळ्यात राजस्थान हे देखील एक फिरण्यासारखे ठिकाण आहे. राजस्थानला जर तुम्ही ट्रीप काढली तर तुम्हाला इथे शेकडो ठिकाणे फिरण्यासारखी भेटतील. तुम्ही जयपुरला देखील भेट देऊ शकता. जयपुरला पिंक सिटी म्हणून ओळखले जाते. याशिवाय तुम्ही राजस्थानातील विविध किल्ल्यांना देखील भेट देऊ शकता. हिवाळ्यात तुम्हाला राजस्थानच्या गरमागरम वातावरणाची मजा घेता येणार आहे.