Bengaluru Chennai Expressway : देशांतर्गत महामार्गाचे जाळे उभारण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून भारतमाला परियोजना राबवली जात आहे. या परियोजनेअंतर्गत देशातील अनेक राज्यात महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या अंतर्गत तयार होणारी महामार्ग ग्रीन फील्ड कॉरिडॉर राहणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून जाणारा सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे याचा देखील समावेश होतो.
याशिवाय बंगलोर चेन्नई ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे या कर्नाटकसाठी अति महत्त्वाच्या अशा महामार्गाचा देखील समावेश होतो. दरम्यान आता बेंगलोर चेन्नई ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे बाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. या महामार्गाबाबत दस्तूरखुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी माहिती सार्वजनिक केली आहे.
गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे बेंगलोर-चेन्नई महामार्ग 17 हजार कोटी रुपये खर्च करून विकसित केला जाणार असून या महामार्गाचे काम जोमात सुरू आहे. हा महामार्ग आता आपल्या अंतिम टप्प्यात प्रवेश करू पाहत आहे. विशेष म्हणजे हा बहुचर्चेत आणि केंद्र शासनाचा महत्त्वकांक्षी असा बेंगलोर चेन्नई ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे मार्च 2024 मध्ये कम्प्लीट होणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.
Route Map : कसा असेल बेंगलोर-चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे ? पहा गावांची नावे
तसेच मंत्री महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे, बेंगलोर ते म्हैसूर दरम्यानही या प्रोजेक्टअंतर्गत महामार्गाचे काम सुरू असून हा प्रोजेक्ट बेंगलोर चेन्नई ग्रीन फील्ड महामार्गाचा एक भाग आहे. बेंगलोर-म्हैसूर हायवे हा 52 किलोमीटर लांबीचा असून यासाठी जवळपास 9000 कोटी रुपये खर्च होणार आहेत. हा बेंगलोर म्हैसूर हायवे येत्या फेब्रुवारी पर्यंत म्हणजेच फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे.
या हायवेच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केलं जाईल असं देखील यावेळी गडकरी यांनी नमूद केलं.खरं पाहता गडकरी बेंगलोर मध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी बेंगलोरुमध्ये सुरू असलेल्या काही महामार्गांची देखील पाहणी केली. यामध्ये बेंगलोर म्हैसूर-हायवेचा देखील समावेश होता.
हायवेची पाहणी झाल्यानंतर त्यांनी काही प्रसारमाध्यमांशी बोलताना ही महत्त्वाची अशी माहिती सार्वजनिक केली आहे.मंत्री महोदय यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, बेंगळुरू-म्हैसूर ग्रीन फील्ड कॉरिडॉर हा खरं पाहता दहा पदरी मार्ग आहे. मात्र यामध्ये महामार्गाशी जी संलग्न गावे किंवा शहरे आहेत त्या दरम्यान प्रवास करण्यासाठी चार लेन या प्रामुख्याने वापरल्या जाणार आहेत.
म्हणजे या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन लेन महामार्गाशी संलग्न असलेल्या गाव, शहरात प्रवासासाठी प्रस्तावित केल्या आहेत. अर्थातच दहा पदरीपैकी एकूण सहा पदरी रस्ता हा बंगलोर ते म्हैसूर दरम्यान जोडण्यासाठी प्रामुख्याने महत्त्वाचा ठरणार आहे. हा सहा पदरी रस्ता या दोन शहरादरम्यान थेट प्रवासासाठी उपयोगी पडणार आहे. तसेच बेंगळुरू-म्हैसूर हायवे दोन भागात विभागला गेला आहे.
पहिला भाग बेंगळुरू ते निदाघट्टा आणि दुसरा निदाघट्टा ते म्हैसूर. एकदा हा मार्ग पूर्ण झाला की या दोन शहरांदरम्यानचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. या होऊ घातलेल्या महामार्गाने प्रवास केल्यास बेंगळुरू ते म्हैसूर प्रवासाचा वेळ फक्त 70 मिनिटे राहणार आहे. यावेळी गडकरी यांनी बेंगळुरूची गर्दी कमी करण्यासाठी या मार्गावरून जाणारी शहरे आणि प्रदेशला औद्योगिक क्लस्टर म्हणून विकसित करणे हे आता राज्य सरकारवर अवलंबून असल्याचे सांगितले आहे.
त्यांच्या मते या महामार्गामुळे कर्नाटकातील कोडागु, तामिळनाडूतील उटी आणि केरळमध्ये प्रवेश मिळेल. बेंगळुरू-चेन्नई द्रुतगती मार्गाबाबत, श्री गडकरी म्हणाले की, 285.3 किमी चौपदरी प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होईल. यामुळे प्रमुख शहरे आणि गजबजलेल्या भागातून जाण्यास होणारा विलंब टाळण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.