Basmati Rice Price : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती व शेतीशी आधारित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतकरी बांधव शेतीमध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड करत असतात.
यात भात पिकाची लागवड देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. देशातील भात लागवडीखालील क्षेत्र देखील विशेष उल्लेखनीय आहे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा भाताचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. राज्याचा विचार केला असता राज्यातील कोकण आणि विदर्भ या दोन विभागात भाताचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
मात्र, आपल्या देशात भाताचे सर्वाधिक उत्पादन पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यात घेतले जाते. जागतिक तांदूळ निर्यातीत आपला भारताचा मोठा सिंहाचा वाटा आहे. एका आकडेवारीनुसार जागतिक निर्यातीत भारताचा वाटा 40% एवढा आहे.
तर दुसरीकडे देशाच्या एकूण निर्यातीत बिगर बासमती पांढऱ्या तांदळाचा वाटा हा 45 टक्के एवढा आहे. खरेतर देशात तांदळाच्या वेगवेगळ्या वाणाची शेती केली जाते. मात्र यामध्ये सर्वाधिक मागणी बासमती तांदळाला असते. या तांदळाला बाजारात विक्रमी भावही मिळतो.
किरकोळ बाजारात बासमती तांदूळ नेहमीच महागात विकला जातो. यामुळे अनेकांना बासमती तांदूळ एवढा महाग का असतो यामागे नेमके कारण काय आहे असा प्रश्न पडला आहे.
दरम्यान आज आपण बासमती तांदूळ एवढा महाग असतो याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बासमती तांदूळ हा आकाराने लांब असतो. या तांदळाची लांबी 8.44 mm पर्यंत असते.
विशेष म्हणजे जुना बासमती तांदूळ हा खाण्याला खूपच चविष्ट असतो. त्यामुळे बासमती तांदूळ 17 ते 18 महिन्यांपर्यंत साठवला जातो आणि यानंतर याची विक्री होते.
या साऱ्या प्रक्रियेमुळे बासमती तांदूळ उत्पादन करणे खूपच आव्हानात्मक असते. बासमती तांदळाला एक विशिष्ट चव आणि सुगंध असतो. यामुळे हा सुवासिक तांदूळ इतरांच्या तुलनेत महाग विकला जातो.
बासमती तांदूळ शिजवल्यानंतर म्हणजेच त्याचा भात तयार झाल्यानंतर याची लांबी आणखी वाढते. परिणामी याला बाजारात नेहमीचं अधिक मागणी असते. विशेष म्हणजे बासमती तांदळात मोठ्या प्रमाणात पोषक घटक आढळतात.
न्यूट्रिशन चे प्रमाण यामध्ये अधिक असल्याने याला बाजारात चांगली मागणी असल्याचे बोलले जाते. तांदूळ बिर्याणीसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. हेच कारण आहे की याला बाजारात मोठी मागणी असते आणि भावही चांगला मिळतो.