एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या Bank Account मधील पैसे कोणाला मिळतात ? RBI चा नियम काय सांगतो, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Banking News : आता प्रत्येक कुटुंबातील एकापेक्षा अधिक जणांचे बँकेत अकाउंट ओपन झाले आहे. शासनाने देखील समाजातील प्रत्येक घटकाला बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. केंद्रातील मोदी सरकारने प्रत्येकाचे बँक अकाउंट असावे यासाठी झिरो बॅलन्समध्ये जनधन योजनेअंतर्गत बँक अकाउंट ओपन करून दिले आहे.

शासनाने दिलेल्या एका आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत जवळपास 51 कोटी लोकांनी जनधन योजनेअंतर्गत बँक अकाउंट ओपन केले आहेत. म्हणजेच खेड्यापाड्यात राहणारा समाज देखील आता बँकिंग व्यवस्थेशी जोडला गेला आहे.

यामुळे देशात डिजिटल इकॉनोमीला विशेष चालना मिळाली आहे. प्रत्येक जण आता ऑनलाईन पेमेंट करत आहे. ग्रामीण भागातही ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. आता प्रत्येकजन आपल्या कमाईतला एक हिस्सा बँकेत ठेवतो, पगारदार लोकांचे तर पेमेंटच बँकेत येते.

मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का, की बँकेत जे पैसे आहेत ते पैसे सदर बँक खाते धारकाचा मृत्यू झाल्यास कोणाला मिळतात ? यामुळे आज आपण याबाबत आरबीआयचा नियम काय आहे हे पाहणार आहोत.

कदाचित अनेकांना याबाबत माहिती असेल मात्र ज्या लोकांना याबाबत माहिती नसेल त्यांच्यासाठी आज आपण बँक खात्यात असणारी रक्कम ही बँक खातेधारकाच्या मृत्यूनंतर कोणाला मिळते याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

मृत्यूनंतर बँक खात्यातील रक्कम कोणाला मिळते

आरबीआयने तयार केलेल्या नियमानुसार, जर एखाद्या बँक खातेधारकाचा मृत्यू झाला तर सदर खातेधारकाच्या बँक खात्यात असणारी रक्कम ही त्याच्या नॉमिनीला दिली जाते. नॉमिनी अर्थातच वारसदार मृत्यू झालेल्या खातेधारकाच्या पैशांसाठी पात्र असतो.

आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी कोणीही नॉमिनी राहू शकते. जेव्हा आपण बँकेत खाते ओपन करतो त्याचवेळी नॉमिनी व्यक्तीचे नाव जोडले जाते. खातेधारकांनी ज्या व्यक्तीला नॉमिनी केलेले असते त्यालाच ही रक्कम मिळते.

आता अनेकांचा असाही प्रश्न आहे की जर बँक खात्याला नॉमिनी नसेल तर अशा बँक खातेधारकाची रक्कम ही कोणाला मिळू शकते ? तर आता आपण याविषयी जाणून घेऊया.

खात्याला नॉमिनी नसल्यास काय करणार

जर मृत खातेदार व्यक्तीच्या Bank Account ला कोणीही वारसदार नसेल तर यासाठी ग्रामपंचायत नगरपालिका किंवा नगरपरिषदेकडून त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना वारस प्रमाणपत्र घ्यावे लागेल. नंतर न्यायालयातून एक वारसा प्रमाणपत्र तयार करावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला पाचशे रुपयाचे आणि 100 रुपयाचे दोन बोन्ड घ्यावे लागतील आणि न्यायालयाच्या माध्यमातून नोटरी करावी लागणार आहे. यानंतर मग सदर मयत व्यक्तीच्या वारसांना बँकेतील रक्कम मिळू शकणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा