पैशांची अडचण आहे, बँकेत एकही रुपया नाही, तरी बँक खात्यातुन काढता येणार 10 हजार ; सरकारच्या ‘या’ योजनेचा मिळणार फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Banking News : गेल्या काही वर्षांमध्ये देशात बँक खातेधारकांची संख्या वाढली आहे. 2014 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने सत्ता स्थापित केल्यानंतर देशातील सर्वचं घटकातील नागरिकांना बँकिंग व्यवस्थेला जोडण्यासाठी अभूतपूर्व प्रयत्न केलेत.

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून 2017 मध्ये जनधन योजना सुरू करण्यात आली आहे. या जनधन योजनेअंतर्गत झिरो बॅलेन्समध्ये बँक अकाउंट ओपन करून दिले जात आहे.

विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत बँक अकाउंट ओपन केल्यास खातेधारकांना विविध सुविधा पुरवल्या जात आहेत. खातेधारकांना चेकबुक, एटीएम कार्ड, पासबुक आणि एक्सीडेंटल इन्शुरन्स मिळत आहे.

यासोबतच या जनधन योजने अंतर्गत बँक अकाउंट ओपन केलेल्या खातेदारांना ओवरड्राफ्टची देखील सुविधा पुरवले जात आहे. खरे तर अनेकदा लोकांना पैशांची गरज असते. मात्र त्यांच्याकडे पैसे शिल्लक नसतात.

अशावेळी लोक उसनवारीने पैसे घेतात आणि आपली गरज पूर्ण करतात. मात्र काही प्रसंगी नागरिकांना उसने पैसे देखील मिळत नाहीत. अशावेळी, त्यांना पैशांसाठी मोठी वणवण करावी लागते.

काही प्रसंगी साधी पाच-सहा हजाराची देखील गरज पूर्ण होत नाही. मात्र आता नागरिकांना त्यांच्या बँक खात्यात पैसे नसले तरी देखील दहा हजारापर्यंतचे पैसे त्यांना काढता येणार आहेत.

ज्या लोकांनी जनधन योजनेअंतर्गत बँक अकाउंट ओपन केले आहे अशा लोकांना हा लाभ मिळणार आहे. म्हणजेच अशा लोकांसाठी दहा हजारापर्यंतची ओरड्राफ्टची सुविधा शासनाकडून उपलब्ध करून दिली जात आहे.

जनधन योजने मधून ज्या लोकांनी बँक अकाउंट ओपन केले आहे अशा लोकांना त्यांच्या बँक खात्यात रक्कम नसली तरी देखील दहा हजारापर्यंतची रक्कम त्यांना काढता येते. म्हणून या ओव्हरड्राफ्टच्या सुविधेमुळे अडचणीच्या काळात जनधन खाते धारकांना फायदा होत आहे.

या जनधन खाते धारकांनाच मिळणार लाभ

मात्र, दहा हजार रुपये ओवरड्राफ्टची सुविधा फक्त अशाच जनधन खातेधारकांना मिळते ज्यांचे अकाउंट सहा महिने जुनी आहे. जर जनधन खातेधारकांचे बँक अकाउंट सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीची असेल तर त्यांना फक्त दोन हजार रुपयांची ओरड्राफ्ट ची सुविधा मिळते.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी बँक खातेधारकाचे कमाल वय 65 वर्षे एवढे असणे आवश्यक आहे. म्हणजे 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या बँक खातेधारकाला याचा लाभ मिळणार नाही. तसेच, या ओव्हरड्राफ्ट रकमेसाठी बँकेकडून ठराविक व्याजदर देखील आकारले जाते. म्हणजेच हे

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा