Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या काही दिवसांमध्ये देशातील विविध बँकांवर कडक कारवाई केली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आरबीआयने देशातील तब्बल 19 महत्त्वाच्या बँका आणि एनबीएफसीवर दंडात्मक कारवाई केली होती. एवढेच नाही तर गेल्या काही दिवसांचा कार्यकाळ पाहिला तर आरबीआयने काही बँकांचे परवाने देखील रद्द केले आहेत.
यामुळे सध्या बँक ग्राहकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्याने आरबीआयने महाराष्ट्रातीलही काही महत्त्वाच्या बँकांचे लायसन्स अर्थात परवाने रद्द केले आहेत. यामुळे सध्या बँक ग्राहकांकडून बँकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशातच आरबीआयने देशातील आणखी दोन महत्त्वाच्या आणि नामांकित बँकांवर मोठी कारवाई केली आहे.
खरंतर आरबीआय म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया हीदेशातील बँकिंग नियामक संस्था आहे. याचाच अर्थ आरबीआयचा देशातील सर्वच बँकांवर कमांड असतो. बँकांसाठी आणि बँकेतील खातेधारकांसाठी आरबीआय ने काही नियमही तयार केलेले आहेत. हे नियम सर्वसामान्य बँक ग्राहकांसाठी तयार करण्यात आले आहेत. यामुळे या नियमांचे बँकांना आणि बँक ग्राहकांना देखील पालन करावे लागते. मात्र अनेकदा बँकांच्या माध्यमातून आरबीआयच्या या नियमांचे पालन होत नाही.
या नियमांचे बँकेकडून उल्लंघन केले जाते. अशावेळी आरबीआय ॲक्शन मोडवर येते आणि जी बँक नियमानुसार चालत नाही त्यांच्यावर कारवाई करते. अशातच आरबीआयने देशातील आयसीआयसीआय आणि कोटक महिंद्रा या दोन्ही बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. आरबीआय ने याबाबत अधिक माहिती दिली आहे. आरबीआय कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कर्ज, आगाऊ तरतुदीशी संबंधित निर्बंधांचे उल्लंघन, फसवणूक करणारे वर्गीकरण आणि बँकांद्वारे अहवाल देण्याशी संबंधित मानकांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांनी आयसीआयसीआय बँकेवर कडक कारवाई केली.
RBI ने या बँकेला 12 कोटी 19 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच आर्थिक सेवांच्या आउटसोर्सिंगमध्ये जोखीम व्यवस्थापन आणि आचारसंहितेशी संबंधित सूचनांचे पालन न केल्याबद्दल कोटक महिंद्रा बँकेला तीन कोटी 95 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र आरबीआयने हा निर्णय नियमांचे उल्लंघन झाले असल्याने घेतला आहे.
पण यामागील हेतू कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर कोणताही निर्णय देणे असा होत नाही. याचाच अर्थ या दोन्ही बँकांवर करण्यात आलेली दंडात्मक कारवाईमुळे बँक ग्राहकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही. यामुळे बँक ग्राहकांनी घाबरून जाण्याचे काहीही एक कारण नाही.